JOIN US
मराठी बातम्या / देश / महत्त्वाची बातमी! गाडीमध्ये 'हे' सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागले 10 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम

महत्त्वाची बातमी! गाडीमध्ये 'हे' सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागले 10 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम

घराबाहेर पडण्याआधी हे सर्टिफिकेट नीट तपासून घ्या, नाहीतर बसेल 10 हजारांचा फटका.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : तुमच्याकडे चारकाची किंवा दुचाकी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या कडे तर PUC सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे या सर्टिफिकेटची एक्सपायरी डेट संपली असेल तर ते रिन्यू करून घ्या. नाहीतर 10 हजारांचा दंड भरावा लागेल. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सुधारित मोटार वाहन कायदा लागू केला. ज्यामध्ये पीयूसी नसलेल्यांसाठी दंड 10 पट वाढविला आहे. त्यानंतर पीयूसी नसल्यास ड्रायव्हरला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल. त्यापूर्वी हा दंड फक्त एक हजार रुपये होता. वाचा- खुशखबर! लॉकडाऊन काळातही EMI भरलाय का? आता मिळणार कॅशबॅक काय आहे PUC? जेव्हा वाहन प्रदूषण नियंत्रणाच्या मानदंडांची पूर्तता करते तेव्हा वाहन मालकास PUC प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या मदतीने हे दिसून येते की वाहन प्रदूषण नियमांनुसार होते. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. सर्व वाहनांना वैध पीयूसी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नवीन वाहनासाठी पीयूसी प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. वाहन नोंदणीच्या एका वर्षा नंतर पीयूसी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागेल. वाचा- महालक्ष्मी देवीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी, PHOTO आला समोर 10 पट जास्त दंड 1 सप्टेंबर 2019 चा सुधारित मोटार वाहन कायदा दिल्लीत लागू झाला. ज्यानंतर नॉन-वॅलिड पीयूसी प्रमाणपत्रासाठी दंड वाढविण्यात आला. पूर्वी पीयूसी नसल्याबद्दल एक हजार रुपये दंड होता. मात्र सुधारित मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर आता दहा हजार रुपये दंड भरावा लागेल. दहा गुणा वाढीनंतर दिल्लीतील सुमारे एक हजार पीयूसी केंद्रांवर गर्दीत अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या