Mahant Narendra Giri Died in Prayagraj: साधु संतांमधील सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष (Akhil Bharatiya Akhada Parishad) महंत नरेंद्र गिरी यांचं निधन झालं आहे. प्रयागराजच्या बाघमबरी मठमध्ये त्यांचं निधन (Narendra Giri Maharaj Death) झालं. अद्याप त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या बातमीनंतर साधू-संतांमध्ये शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांची खोली आतून बंद होती. ज्यानंतर संशय निर्माण झाला आणि त्यांची खोली उघडण्यात आली. खोलीमध्ये महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांब्याला लटकलेल्या अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सांगितलं जात आहे की, महंत नरेंद्र गिरी गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होते. हत्येचा केला नकार.. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी हत्या केल्याची शक्यता फेटाळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली आहे. मात्र अद्याप पोलिसांनी याची पुष्टी केलेली नाही. त्यांच्या मृत्यूचं कारण आत्महत्या (narendra giri maharaj suicide) असल्याचं सांगण्यास आलेलं नाही. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे. कोणालाही बारंबरी मठात घुसण्याची परवानगी दिली जात नाही. फॉरेन्सिक टीम या प्रकरणात तपास करीत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आखाडा परिषदेतील अंतर्गत मतभेदाच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. हे ही वाचा- ‘मी अजून जिवंत आहे’; सोशल मीडियावर निधनाचं वृत्त पाहून आमदारानं स्वतःच सत्य आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अयोध्येत शोककळा पसरली आहे. हनुमानगडीतील राजू दास यांनी सांगितलं की, आखाडा परिषदेच्या अध्यक्षांच्या निधनाचं वृत्त खूप दु:खदायक आहे. सनातन धर्माच्या रक्षेसाठी ते सदैव तत्पर होते.
दुसरीकडे महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे आनंद गिरींनी महंत नरेंद्र गिरीबाबात म्हटलं आहे की, त्यांच्या हत्येचं षड्यंत्र रचण्याच आलं होतं. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.