भोपाळ, 17 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) रतलाममधील 7 वीच्या विद्यार्थिनीचा खेळाच्या मैदानात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुतेग बहादुर अकॅडमीची आहे. विद्यार्थिनीचं नाव अक्षरा मूणत (13) असून खेळता खेळता ती चक्कर येऊन खाली पडली. तातडीने शाळेतील शिक्षकांनी तिला रुग्णालयात हलवलं. मात्र येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. (7th grader dies while playing basketball) मैदानात चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थिनीला रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे शिक्षकांचीही तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांनाही तातडीने आयसीयूमध्ये भरती करावं लागलं. शाळेचं सीसीटीव्ही तपासण्यात आलं. मात्र नेमकं कारण समोर आलेलं नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकं कारण समोर येईल, असं सांगितलं जात आहे. शाळेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला फिट्स आली होती. मात्र तिच्या पालकांनी यास नकार दिला आहे. ती आजारी नव्हती, असं त्यांचं म्हणणं आहे. हे ही वाचा- महिला डान्सरच्या चेहऱ्यावर पिस्तुल नेत तरुणाचं अश्लील नृत्य; Shocking Video घटनेनंतर ऑडियो आला समोर.. या दुर्देवी घटनेनंतर एक ऑडियो समोर आला आहे. यात मुलीसोबत खेळणारी तिची मैत्रिणी आपल्या वडिलांना घटनेबद्दल सांगत आहे. ती म्हणते की, खेळताना अक्षराला बास्केट बॉल डोक्यात लागला होता. यानंतर ती खाली पडली. मात्र या ऑडिओची पुष्टी करण्यात आलेली नाही. अक्षराच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी शाळेच्या निष्काळजीपणाबद्दल सवाल उपस्थित केला. याशिवाय त्यांनी मुलीचं नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.