नवी दिल्ली, 28 मे : अंदमानहून केरळच्या (Kerala) दिशेनं पोहोचलेला मान्सून (Monsoon) देशात पुढच्या तीन दिवसांमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं हवामान विभागानं (Weather Forecast)आधी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून 1 जूनला किंवा कदाचित 31 मेलाच मान्सूनकेरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता बळीराजा शेतीची सर्व कामं उरकून मान्सूनकडं नजरा लावून बसलेला आहे. (वाचा- PM इव्हेंट मॅनेजर, त्यांची नौटंकीच दुसऱ्या लाटेस कारणीभूत, राहुल गांधींची टीका ) सध्या केरळच्या किनारपट्टीपासून अंदाजे 200 किलोमीटर अंतरावर मान्सून असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तौक्ते आणि त्यांनंतर आलेल्या यास चक्रीवादळामुलं केरळमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी झालं होतं. पण या चक्रीवादळांमुळं मान्सून दोन तीन दिवस आणखी आधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण आता मान्सून 31 मे किंवा 1 जून दरम्यानच दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनचा वेग दरवर्षीप्रमाणेच सामान्य आहे. त्यामुळं सद्या तो केरळच्या दिशेनं प्रवास करत आहे. गुरुवारी मालदीव ओलांडून मान्सून पुढं सरकला आहे. त्यामुळं लवकरच आता देशात मान्सूनच्या सरी बरसतील. (वाचा- महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट ) देशात आणि राज्यात मान्सूनचं वेळेत आगमन होणार असून समाधानकारक असा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात तळकोकणामध्ये आणि मुंबईत 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. तर तर 15 ते 20 जून दरम्यान मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 98 टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळं नागरिक, प्रशासन, सरकार सगळेच हैराण झाले आहेत. मात्र या संकटाच्या काळातही संपूर्ण देशाची घडी देशातल्या शेतकऱ्यामुळं काहीशी चांगली राहिली आहे. त्यामुळं जर शेतकरी सुखात राहिला तर अशा मोठ्या संकटावरही आपण मात करू शकतो.