JOIN US
मराठी बातम्या / देश / 7 महिन्यांनी शाळा सुरू होताच माकडांनी घेतला ताबा; पटकावली प्राचार्यांची खुर्ची, पाहा Video

7 महिन्यांनी शाळा सुरू होताच माकडांनी घेतला ताबा; पटकावली प्राचार्यांची खुर्ची, पाहा Video

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे शाळा सुरु झाल्याच्या (Schools reopen) दुसऱ्याच दिवशी माकडांनी (Monkeys) शाळेवर हल्लाबोल करत गोंधळ घातला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ग्वालियर, 28 जून : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे शाळा सुरु झाल्याच्या (Schools reopen) दुसऱ्याच दिवशी माकडांनी (Monkeys) शाळेवर हल्लाबोल करत गोंधळ घातला. शाळेत अकरावीच्या प्रवेशासाठी (FYJC admission) आलेले विद्यार्थी, (students) पालक, (Parents) शाळेचे कर्मचारी, (school staff) शिक्षक (teachers) आणि प्राचार्य (principle) या सर्वांना या माकडांनी जेरीस आणले.

मध्यप्रदेशच्या ग्वालियरजवळ डबरा येथील सरकारी शाळेत माकडांनी अचानक हजेरी लावली. शाळा सुरु झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा प्राचार्य जेव्हा शाळेत त्यांच्या कक्षात आले, तेव्हा त्यांच्या खुर्चीवर एक माकड बसलं होतं. आणखीही काही माकडं आजूबाजूला होती. प्राचार्यांना पाहताच माकडं आक्रमक झाली. त्यामुळे प्राचार्यदेखील चांगलेच घाबरले आणि तात़डीने केबिनच्या बाहेर आले. शाळेचा दुसरा दिवस मध्यप्रदेशमध्ये सात महिने बंद असलेल्या शाळा मंगळवारपासून सुरु झाल्या. त्याचसोबत अकरावीची प्रवेश प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी शाळेत आले होते. सोबत त्यांचे पालकही होते. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता. त्याचवेळी अचानक 5 ते 6 माकडांनी शाळेत प्रवेश केला आणि वाट मिळेल तिकडं उड्या मारायला सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही गोंधळाची स्थिती निर्माण झाली. माकडांपासून सगळेच दूर पळू लागले. यावेळी एका विद्यार्थ्याचा आणि शाळेतील दोन कर्मचाऱ्यांचा चावा घेतला. वर्गातही मांडला उच्छाद काही वर्गांमध्ये लेक्चर्स सुरू असताना माकडांनी प्रवेश केला आणि शिक्षकांच्या डोक्यावरच उडी घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पळापळ सुरु झाली. काही विद्यार्थ्यांनी धीर एकवटत या माकडांना हुसकावून लावलं. मात्र एका वर्गातून हुसकावलेली ही माकडं दुसऱ्या वर्गात शिरायची आणि तिथं गोंधळ घालायची. जवळपास तासभर माकडांनी शाळेला वेठिला धरलं आणि पुरता गोंधळ घातला. हे वाचा - ‘…तर एका वर्षात बुमराहचा खेळ खल्लास!’ शोएब अख्तरचा टीम इंडियाला गंभीर इशारा वनविभागाकडे तक्रार शाळा बंद असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या माकडांचा तिथेच मुक्काम होता. आता शाळा सुरु झाल्यानंतर मात्र माकडांना तिथून बाहेर पडावं लागलं आहे. मात्र सवयीनुसार माकडं वारंवार या ठिकाणी येत असून वनविभागाकडं शाळेच्या वतीनं तक्रार करण्यात आली आहे. लवकरात लवकर या माकडांचा बंदोबस्त करून त्यांना जवळच्या जंगलात सोडण्यात यावं, अशी विनंती शाळेनं केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या