JOIN US
मराठी बातम्या / देश / Mohali Blast: मोहालीत इंटेलिजन्स ऑफिसवर हल्ल्यानंतर हाय अलर्ट, कारमधून येताना दिसले 2 संशयित

Mohali Blast: मोहालीत इंटेलिजन्स ऑफिसवर हल्ल्यानंतर हाय अलर्ट, कारमधून येताना दिसले 2 संशयित

मोहालीमधील रॉकेट हल्ल्यानंतर (Blast in Mohali) पंजाब पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. पंजाबच्या मोहालीमध्ये सोमवारी संध्याकाळी उशिरा पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेटने हल्ला करण्यात आला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मोहाली, 10 मे: मोहालीमधील रॉकेट हल्ल्यानंतर (Blast in Mohali) पंजाब पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. पंजाबच्या मोहालीमध्ये सोमवारी संध्याकाळी उशिरा पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेटने (Blast outside Intelligence Department building of Punjab Police) हल्ला करण्यात आला. ज्यामुळे पंजाबमधील यंत्रणार अलर्ट झाली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डीजीपींकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याची माहिती मोहालीचे एसपी (मुख्यालय) रविंदर पाल सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रविंदर पाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा ब्लास्ट किरकोळ होता. हा हल्ला बिल्डिंग बाहेरुन झाला. रॉकेट-सारख्या फायरद्वारे हा हल्ला करण्यात आला. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. आमचे वरिष्ठ अधिकारी आणि FSL टीम याचा तपास करत आहेत.’

दरम्यान जेव्हा त्यांना विचारण्यात आले की हा आतंकवादी हल्ला असू शकतो का त्यावेळी त्यांनी असे म्हटले की, ‘हे आपण दुर्लक्षित करू शकत नाही. आम्ही तपास करत आहोत.’

दोन संशयित कारमधून आले, 80 मीटर अंतरावरुन हल्ला या हल्ल्यानंतर काही धक्कादायक खुलासे देखील समोर येऊ लागले आहेत. मोहालीच्या पोलीस इंटेलिजन्स हेडक्वार्टरच्या बिल्डिंगमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार असे समोर आले आहे की याठिकाणी कारमधून दोन संशयित येताना दिसले होते. या लोकांनी जवळपास 80 मीटर अंतरावरुन रॉकेटमधून ग्रेनेड हल्ला केला होता.  अशी देखील माहिती समोर आली आहे की या हल्ल्याचे कोणतेही लक्ष्य नव्हते तर रँडम फायर करण्यात आली होती. हे वाचा- शेतकऱ्यांना वादळाची भीती, कच्चेच आंबे काढले विक्रीला; या राज्यांमध्ये अलर्ट याप्रकारानंतर इंटेलिजन्स अधिकारी आणि तपास यंत्रणा सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल फोन टॉवर्सचा तपास सुरू आहे. असा अंदाज आहे की रॉकेट लाँचर ड्रोनद्वारे करण्यात आले होते. मोहालीच्या सोहानामध्ये इंटेलिजन्स ब्युरोच्या मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हा ब्लास्ट झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. अशी माहिती मिळते आहे की रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास डागण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या