नवी दिल्ली, 13 मे : केरळ राज्यात एका घटनेने वातावरण तापले गेले. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Governor Arif Mohammad Khan) यांनी ट्विट करत मल्लपुरम येथील एका मौलवी यांच्यावर टीका केली. कारण एका पुरस्कार सोहळ्यात मंचावर मुलीला बोलवण्यात आले होते. यामुळे मौलवीने त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना झापले होते. ही घटना मल्लपुरम (Mallapuram) येथे तयार करण्यात आलेल्या नवीन मदरसा येथील आहे. जिथे विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येत होते. जेव्हा पुरस्कार दिले जात होते तेव्हा मुस्लिम विद्वान एम. टी. अब्दुल्ला मुस्लियार यांनी मुलीला मंचावर का बोलविण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला. महिला आयोगानेही घेतली दखल - यानंतर केरळ बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली. त्याचवेळी, केरळ महिला आयोगाने म्हटले आहे की, तक्रार आल्यानंतर ज्याने मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवर कारवाई केली जाईल. मंत्री आर बिंदू आणि वीणा जॉर्ज यांनीही या प्रकरणाचा निषेध केला आहे. बालहक्क समितीने समस्थ या धार्मिक संस्थेच्या सचिवाकडून उत्तर मागितले असून मल्लपुरम पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा पी. सतीदेवी यांनी म्हटले आहे की, पीडित किंवा तिच्या जवळची व्यक्ती तक्रारीसाठी तिच्याशी संपर्क साधू शकते. हेही वाचा - पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत होती, दारूच्या नशेत पतीने तिच्यावर केला चाकूने हल्ला
खरं तर, गुरुवारी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, या मुद्द्यावर राजकीय मौन धारण केल्याने ते दुःखी आणि निराश झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मुलीचा अपमान करणे यासारख्या गुन्ह्यांची दखल राज्य संस्थांनीच घ्यावी, असे ते म्हणाले आहेत. हे मानवी अधिकारांचे उल्लंघन आहे, असेही ते म्हणाले. एक सामान्य नागरिक असल्याने हे खपवून घेतले जाऊ नये कारण हे भारतीय लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही.
हेही वाचा - पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत होती, दारूच्या नशेत पतीने तिच्यावर केला चाकूने हल्ला
इस्लामबद्दल भीती निर्माण करणे हे ध्येय -
मुंबईला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर पत्रकारांशी राज्यपाल यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिजाबावरही म्हटले की, मुलीने डोकं झाकल्यावर एवढी कठोर मानसिकता का स्वीकारली गेली? त्यांचे खरे ध्येय हिजाब नाही तर जगभरात इस्लामबद्दल भीतीचे वातावरण निर्माण करणे, हा आहे. त्याच वेळी केरळचे मंत्री आर बिंदू म्हणाले की, एक शिकलेल्या मुलीला सन्मान हवा आहे. कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी तिचे स्वागत करायला हवे होते. तथापि, त्यांनी मौलवीला वैयक्तिकरित्या लक्ष्य केले नाही.