JOIN US
मराठी बातम्या / देश / दिल्लीतही 'ऑपरेशन लोटस'? 'आप'चे अनेक आमदार नॉट रिचेबल; अरविंद केजरीवालांनी बोलावली बैठक

दिल्लीतही 'ऑपरेशन लोटस'? 'आप'चे अनेक आमदार नॉट रिचेबल; अरविंद केजरीवालांनी बोलावली बैठक

दिल्लीत आम आदमी पक्षाचे 62 आमदार आहेत. एक दिवस आधी म्हणजे 24 ऑगस्टला आम आदमी पार्टीने भाजपवर मोठा आरोप केला होता. भाजप दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा दावा ‘आप’ने केला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : महाराष्ट्र, बिहारनंतर आता दिल्लीत अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. कारण दिल्लीतील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात आम आदमी पक्षाचे अनेक आमदार संपर्कात नसल्याची बाब समोर येत आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. आज सकाळी 11 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यापूर्वी आम आदमी पक्षाच्या 4 आमदारांनी भाजपवर 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला होता. बुधवारी सायंकाळी आम आदमी पक्षाने सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत किती आमदार पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे 62 आमदार आहेत.

MLA Prashant Bamb : आमदाराला कॉल करून सामान्य शिक्षकाने धरले धारेवर, तुमची मुले कुठे शिकतात विचारला जाब

संबंधित बातम्या

एक दिवस आधी म्हणजे 24 ऑगस्टला आम आदमी पार्टीने भाजपवर मोठा आरोप केला होता. भाजप दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा दावा ‘आप’ने केला होता. यासाठी भाजपने आम आदमी पक्षाच्या चार आमदारांना 20-25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. मुंबई महापालिकेवरून सरवणकरांचे गौप्यस्फोट, मुख्यमंत्र्यांची एसीबी चौकशीची घोषणा, ठाकरेंची अडचण वाढणार? आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केले. नरेंद्र मोदी सरकारच्या ‘साम दाम दंड भेड’चा मी पर्दाफाश करेन, असं संजय सिंह म्हणाले होते. पंतप्रधान कसे दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचे लोक आमच्या आमदारांना भेटायला येतात. मनीष सिसोदियांसारखे खोटे गुन्हे दाखल करतील, अशी धमकी देतात, असे संजय सिंह म्हणाले होते. आता आमदार फोडण्यासाठी 20 आणि 25 कोटींचे आमिष दिले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या