मध्य प्रदेश, 20 नोव्हेंबर: मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एका विचित्र अपघाताची (strange accident) बातमी समोर आली आहे. सैन्य भरतीची तयारी करून परतणाऱ्या तरुणाचा शुक्रवारी रस्ता अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावर तरुणाची बाईक घसरली आणि तो पडला. मागून येणाऱ्या मिनी ट्रकनं तरुणाला चिरडले. ट्रकचं चाक तरुणाच्या डोक्यावरून गेलं. ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात सुमारे 4 सेकंदात तरुणाचा श्वास थांबल्याचं दिसून येत आहे. बैतुल गंज पोलिस स्टेशनचे ASI जुगल किशोर यांनी सांगितलं की, राठीपूरचे रहिवासी बसंत पाठा (19) दररोज सकाळी सैन्य भरती प्रशिक्षण केंद्रात जायचा. शुक्रवारी तो केंद्रातून राठीपूर येथील त्याच्या घराकडे जात होते. हमलापूर येथील बैतूल-आमला रस्त्यावरील तिवारी पेट्रोल पंपासमोर त्याची बाईक घसरली. तरुण पडताच मागून भरधाव वेगानं येणाऱ्या मिनी ट्रकनं त्याला चिरडलं. मिनी ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेलं. तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
नेमका कसा झाला अपघात पेट्रोल भरून तरुण रस्त्यावर येताच रस्त्यावर पाणी सांडलं होतं. त्या पाण्यावरुन त्याची बाईक घसरली आणि याच दरम्यान मागून भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडले. ट्रकचा वेग इतका होता की ट्रक चालकाला वेगावर नियंत्रण ठेवण्यासही वेळ मिळाला नाही. तरुणाला चिरडल्यानंतर ट्रकचालकही थांबला नाही आणि त्याच वेगाने ट्रक घेऊन पळून गेला. हेही वाचा- महिला आमदाराचा Boyfriend सोबतचा अश्लील Video viral करणारा अटकेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी ट्रक (MP-48G-2285) केळी घेऊन आमलाकडे जात होता. अपघातानंतर स्थानिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. गंज पोलिसांनी ट्रक चालक शेख मोहम्मद अली ताब्यात घेऊन ट्रकही जप्त केला आहे.