मुंबई, 09 ऑक्टोंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. यानंतर राज्यासह देशभरातून राजकीय व्यक्तींनी यावर प्रतिक्रीया देण्यास सुरू केले आहे. दरम्यान निवडणूक आयोगाची पुढची सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगण्यात आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. यावर सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बाजूने भुमीका मांडणारे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर जोरादर टीका केली आहे.
ते म्हणाले कि, काल जो काही केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तो अतिशय निंदणीय आहे. एकप्रकारे निवडणूक आयोग पडद्यामागून केंद्र सरकारची सादरीकरण करत आहे. केंद्राच्या शब्दावर चालणाऱ्या निवडणूक आयोगाची मला लाज वाटत असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : शिवसेना नाव कायम राहणार, मात्र…, उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक माहिती आली समोर!
सेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले यातूनच कित्येक रुपयांना लोकशाही गोठवण्याचे काम केले आहे. भाजपचे ताठ उचलणाऱ्या शिंदे गटाने हे कृत्य असल्याचे ते म्हणाले. धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचे आहे. भाजपचे तळी उचणाऱ्या शिंदे गटाचे तर नसल्याचे त्यांनी खरमरीत टीका केली आहे.
काय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश :
1) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.
२) दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
3) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात.
4) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे ही वाचा : ‘खोकेवाल्या गद्दारांनी निर्लज्ज प्रकार केला पण..’; चिन्ह गोठवल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप
(i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि
यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो
आयोगाने मंजूर केलेले आणि;
(ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर
संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.
त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.