JOIN US
मराठी बातम्या / देश / 40 रुपयांमध्ये बदललं नशीब! बँक अकाऊंटही नसलेल्या मजुराला लागली 80 लाखांची लॉटरी

40 रुपयांमध्ये बदललं नशीब! बँक अकाऊंटही नसलेल्या मजुराला लागली 80 लाखांची लॉटरी

एखाद्या व्यक्तीचं नशीब (Luck) जोरावर असेल तर त्याला अगदी स्वप्नात वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज घडतात. नशिबानं साथ दिली तर ती व्यक्ती एखादा गरीब व्यक्ती एका रात्रीमध्ये श्रीमंत बनतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मार्च :  एखाद्या व्यक्तीचं नशीब (Luck) जोरावर असेल तर त्याला अगदी स्वप्नात वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज घडतात. नशिबानं साथ दिली तर एखादा गरीब व्यक्ती एका रात्रीमध्ये श्रीमंत बनतो. मजुरी करुन आपलं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीलाही याचा प्रत्यय आला आहे. ती व्यक्ती चक्क 40 रुपयांमध्ये लखपती झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) राहणारे प्रतिभा मंडल असं या भाग्यवान व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी केरळ सरकारकडून (Kerala Government) काढण्यात येणारी 80 लाख रुपयांची कारुण्य प्लस लॉटरी (Karunya plus lottery) जिंकली आहे. प्रतिभा एक प्रवासी मजूर आहेत. ते तिरुवनंतपुरमधील एका बांधकामच्या ठिकाणी काम करतात. त्यांनी 40 रुपयांचे लॉटरी तिकीट काढले होते. त्या एका तिकीटानं ते आता थेट लखपती झाले आहेत. अचानक मिळालेल्या या पैशामुळे त्यांना आनंद झालाच पण त्याचबरोबर भीती देखील वाटली. त्यांचं साधं बँक अकाऊंटही नाही. त्यातच इतका पैसा मिळाल्यानं त्याचं काय करायचं? हा प्रश्न त्यांना पडला. पोलीस स्टेशनमध्ये धाव प्रतिभा यांनी या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी त्यांची अडचण लक्षात घेऊन बँक कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले. त्यांचे बँक अकाऊंट काढले आणि त्यामध्ये लॉटरीची रक्कम जमा केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरी सोडले. केरळ सरकारच्या कारुण्य प्लस लॉटरीमधील पहिल्या विजेत्याला 80 लाख रुपये मिळतात. दुसऱ्या विजेत्याला 10 लाख तर त्यानंतर उत्तेजनार्थ म्हणून 8000 रुपयांचे बक्षीस दिले जाते. ( वाचा :  कोटींची संपत्ती असणाऱ्या व्यक्तीचा दारूने घात; आता भिकाऱ्याचं जीणं आलं नशिबी  ) एखाद्या व्यक्तीनं 5000 पेक्षा कमी रकमेची लॉटरी जिंकली असेल तर त्याला ती रक्कम थेट दुकानामधून मिळते. 5000 पेक्षा जास्त रक्कम असेल तर ते तिकीट आणि ओळखपत्र सरकारी लॉटरी ऑफिस किंवा बँकेत दाखवणे आवश्यक आहे. लॉटरीच्या विजेत्याला 30 दिवसांच्या आता कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या