मुंबई, 26 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तामिळनाडूच्या शेतकरी पप्पाम्मल (Pappammal) यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मोदी हात जोडून त्यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. ‘आज कोईम्बतूरमध्ये (Coimbatore) असमान्य अशा पप्पाम्मलजींची भेट झाली. त्यांना कृषी आणि ऑरगॅनिक शेती (Organic farming) क्षेत्रातील योगदानासाठी यावर्षी पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे,’ असं कॅप्शन मोदींनी या फोटोला दिलं आहे. कोण आहेत पप्पाम्मल? 1914 मध्ये जन्म झालेल्या पप्पाम्मल या तामिळनाडूमध्ये ऑरगॅनिक शेती करतात. त्या तामिळनाडूमध्ये ऑरगनिक शेतीच्या प्रणेत्यांपैकी एक आहेत. तसंच तामिळनाडूच्या कृषी विद्यापीठाशी जोडलेल्या आहेत. त्या वयाच्या 106 व्या वर्षी देखील त्यांच्या 2.5 एकर शेतामध्ये रोज काम करतात. ‘द हिंदू’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार पप्पाम्मल या डीएमके (DMK) पक्षाच्या सदस्य आहेत. तसंच दिवंगत मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या मोठ्या प्रशंसक आहेत. मोदींचा तामिळनाडू दौरा तामिळनाडूमध्ये यंदा विधानसभा निवडणुका आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी एक आठवड्यापूर्वी देखील राज्याचा दौरा केला होता. अवघ्या तीन तासांच्या चेन्नई भेटीत त्यांनी आध्यात्मिक गुरु बंगारु आदिगाल (Bangaru Adigal) यांची भेट घेतली होती. 80 वर्षांच्या आदिगाल यांच्यावर श्रद्धा असणारे भक्त सर्वच पक्षांमध्ये आहेत. भाजापासह अन्य पक्षांचे नेते देखील त्यांची भेट घेतात. तामिळनाडूचे राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. (हे वाचा: आता पाठ्यपुस्तकं विकत घेण्याची गरज नाही, शिक्षणमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा ) आदिगल अम्मांचं व्यापक काम आदिगाल त्यांच्या शिष्यांमध्ये अम्मा म्हणून प्रसिद्ध आहेत. शिष्यांना त्यांच्यापासून आईचं प्रेम मिळतं अशी शिष्यांची श्रद्धा आहे. ते आदिप्रशक्ती चॅरीटेबल मेडिकल एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्टच्या प्रमुख आहेत. चेन्नईपासून 90 किलोमीटर अंतरावरील विल्लूपुरममध्ये या ट्रस्टचे एक मेडिकल कॉलेज काही इंजिनिअरिंग कॉलेज तसंच अनेक शिक्षण संस्था आहेत.