JOIN US
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी: लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीची तारीख ठरली, Age Proof साठी लागणार हे पुरावे

मोठी बातमी: लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीची तारीख ठरली, Age Proof साठी लागणार हे पुरावे

15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी आली आहे.

जाहिरात

child vaccination

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 डिसेंबर: 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी आली आहे. 1 जानेवारीपासून 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी(Children aged 15-18 can register on CoWIN from Jan 1 for Covid vaccination) करु शकता. कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. डॉ. शर्मा म्हणाले, “15  ते 18  वयोगटातील मुलं 1 जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील. यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्रासाठी 10  वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कुठलं ओळखपत्र नसू शकतं. त्यामुळं त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) नुकतंच देशाला संबोधित करताना लसीकरणासंदर्भात तीन मोठ्या घोषणा केल्या.  मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच 10 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि 60  वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या