नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: साधारणपणे कोणतंही सरकार पूल, रस्ते बांधताना दिलेल्या वेळेत कधीही पूर्ण करत नाही. याचबरोबर यासाठी जी काही प्रस्तावित रक्कम बजेटमध्ये असते त्या रकमेतही हे काम कधी पूर्ण होताना दिसत नाही. कुठल्याही सरकारी विकास कामांंचा वेळ आणि पैसा वाढता वाढता वाढतच जातो. काम पूर्ण होणारा कालावधी वाढला की, या कामाचा खर्च कैकपटीनं वाढलेला असतो. पण आता काही राजकारण्यांकडून विपरितच घडलं आहे. दिल्ली सरकारने (Delhi Government) हा पायंडा मोडला असून केजरीवाल सरकारच्या काळात उड्डाणपुलाचं काम चक्क ठरलेल्या मुदतीच्या आत आणि अंदाजित रकमेपेक्षा कमी किमतीत पूर्ण झालं आहे. जनतेच्या पैशाची मोठी बचत झालेली पाहायला मिळत आहे. यामध्ये केजरीवाल सरकारने (Kejriwal Government) आपल्या दोन्ही कार्यकाळात दिल्लीमध्ये उभारण्यात आलेल्या पुलांच्या पैशांमध्ये केवळ बचत केलेली नसून ठरलेल्या कालावधीच्या आत याचं कामदेखील पूर्ण केलं आहे. जवळपास 500 कोटी रुपयांची बचत करण्यात आली आहे. दिल्लीतील नागरिकांना वाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिल्लीमध्ये अनेक फ्लायओव्हरची(Fly Over) उभारणी केली आहे. सरकारने शास्त्री पार्क व सीलमपूरचे दोन उड्डाणपूल रेकॉर्ड रकमेची बचत करत पूर्ण केले आहेत. 303 कोटी रुपयांचं हे काम सरकारने 250 कोटी रुपयांमध्ये पूर्ण केलं आहे. यामुळं या कामामध्ये जवळपास 23 कोटी रुपयांची बचत झाली आहे. या दोन्ही पुलांच्या उभारणीमुळं जवळपास दीड लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे ही वाहतुकीतील अडथळे दूर करणे, सुलभ वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करणे आणि नॉन मोटराइज्ड वाहनांच्या वापरास प्रोत्साहित करणे, पायाभूत सुविधा तयार करणे आणि रस्त्याच्या कडेला लागून जागेचा कार्यक्षम वापर करणे हे आहे. मागील दहा प्रोजेक्टमध्ये केजरीवाल सरकारने 125 कोटी रुपयांची बचत केली आहे. या 10 प्रोजेक्टसाठी एकूण 422 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु सरकारने 297 कोटी रुपयांमध्ये हे काम पूर्ण करत जवळपास 125 कोटी रुपयांची बचत केली आहे. याचबरोबर दिल्ली सरकरने आणखी 3 प्रकल्पांमध्ये 310 कोटी रुपयांची बचत केली आहे. मंगोलपुरी ते मधुबन चौक प्रकल्पाची अंदाजित किंमत ही 423 कोटी रुपये होती. परंतु राज्य सरकारने हा प्रकल्प 320 कोटींमध्ये पूर्ण करत यामध्ये 100 कोटी रुपयांची बचत केली. मीरा बाग ते विकासपुरीपर्यंतच्या एलिव्हेटेड कॉरिडोरची अंदाजित कामाची रक्कम ही 560 कोटी रुपये होती. परंतु राज्य सरकारने हे काम 460 कोटींमध्ये पूर्ण करून 100 कोटींची बचत केली आहे. याचप्रमाणे प्रेम बारापुला ते आझादपूर या प्रकल्पाची देखील प्रस्तावित किंमत ही 247 कोटी रुपये होती. पण सरकारने हे काम 137 कोटींमध्ये करत 110 कोटींची बचत केली आहे.
हे देखील वाचा - PM Kisan Scheme: शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीत नाव येण्यासाठी करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत पैसे
मोठ्या प्रकल्पांमध्ये पैश्यांची बचत करण्याबरोबरच केजरीवाल सरकार 100 कोटींपेक्षा कमी किंमतीच्या छोट्या प्रकल्पात देखील कोट्यावधी रुपयांची बचत करीत आहे. जगतपूर चौक उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची किंमत ही 80 कोटी रुपये होती. पण सरकारने 72 कोटींमध्ये पूर्ण करून 8 कोटी रुपयांची बचत केली. याचबरोबर भालस्वा उड्डाणपुलामध्ये 16 कोटी, बुराडी उड्डाणपुलामध्ये 15 कोटी, मुकुंदपूर चौक उड्डाणपुलामध्ये 4 कोटी रुपयांची बचत केली. याचबरोबर मयूर विहार उड्डाणपूल प्रकल्पात देखील 5 कोटी रुपयांची बचत केली आहे. केजरीवाल सरकारने या प्रकल्पांमध्ये केली एकूण 508 कोटी रुपयांची बचत उड्डाणपुलाच नाव प्रस्तावित खर्च काम पूर्ण बचत (सर्व रकमा कोटी रुपयांमध्ये) मोंगलपूर ते मधुबन चौक 423 323 100 मधुबन चौक ते मुकरबा चौक कॉरिडोर 422 297 125 विकासपुरी ते मीरा बाग एलिव्हेटेड कॉरिडोर 560 460 100 प्रेमबारापुला ते आझादपूर कॉरिडोर 247 137 110 शास्त्रीपार्क आणि सीलमपूर फ्लायओव्हर 303 280 23 जगतपूर चौक उड्डाणपूल 80 72 8 भाला फ्लायओव्हर 64 48 16 बुरी फ्लायओव्हर 57 42 15 मुकुंदपूर चौक उड्डाणपूल 62 58 04 एकूण बचत 508 कोटी रुपये