JOIN US
मराठी बातम्या / देश / 50 किलोमीटरच्या शत्रूचा नाश करणारं K9-वज्र होवित्झर रेजिमेंट तैनात, जाणून घ्या वैशिष्ट्ये

50 किलोमीटरच्या शत्रूचा नाश करणारं K9-वज्र होवित्झर रेजिमेंट तैनात, जाणून घ्या वैशिष्ट्ये

पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराने चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) लडाख सेक्टरमध्ये पहिली K9-वज्र स्वयंचलित होवित्झर रेजिमेंट तैनात केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लडाख, 02 ऑक्टोबर: पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराने चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) लडाख सेक्टरमध्ये पहिली K9-वज्र स्वयंचलित होवित्झर रेजिमेंट तैनात केली आहे. ही K9-वज्र (K9-Vajra) स्वयंचलित होवित्झर तोफ शत्रूच्या लक्ष्यांवर सुमारे 50 किमीवर हल्ला करू शकते. या तोफा अधिक उंचीच्या भागातही काम करू शकतात. K9-वज्र तोफेच्या कामगिरीवर बोलताना लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले की, त्याची मैदानी चाचणी खूप यशस्वी होती. आपण आता सैन्यात एक संपूर्ण रेजिमेंट जोडली आहे जी खूप उपयुक्त ठरेल.

पुढे ते म्हणाले की, पूर्व लडाख आणि उत्तरेकडच्या सीमेवर चीनने (china) मोठ्या संख्येने आपलं सैन्य तैनातं केलं आहे. सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुखांनी पूर्व लडाखमधील (eastern ladakh) फॉरवर्ड भागांचा दौरा केला.

संबंधित बातम्या

लष्कराचे K-9 वज्र हे सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी आहे. यात तोफ आणि टँक दोन्हीची वैशिष्ट्ये आहेत. K-9 वज्रामध्ये अशी रेंज आणि शक्ती आहे, जी 18 किमी ते 50 किमी पर्यंत कोणत्याही शत्रूचा तळ नष्ट करू शकते. यात टँकची पॉवर पॅक वैशिष्ट्ये देखील आहेत. टँकप्रमाणे K -9 वज्र कोणत्याही प्रकारच्या मैदानात वेगानं फिरू शकते. हे जगातील सर्वात आधुनिक आणि हायटेक सेल्फ आर्टिलरी मानलं जातं आहे.

जाहिरात

K-9 वज्र स्वयंचलित K-9 वज्र हे स्वयंचलित आहे. ही एक स्वयंचलित कॅनल बेज्ड आधारित आर्टिलरी सिस्टम आहे. ज्याची क्षमता 40 ते 52 किलोमीटर आहे. त्याच वेळी, त्याची ऑपरेशनल रेंज 480 किमी आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन याच्या निर्मितीसाठी गुजरातमधील हजीरा येथे एक विशेष कारखाना बांधण्यात आला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे K9 वज्र स्वदेशी बनवलेलं आहे. हे दक्षिण कोरियाच्या मदतीने भारतात बनवलं गेलं आहे. हेही वाचा-  IPL 2021, RR vs CSK : महेंद्रसिंह धोनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध करणार ‘द्विशतक’!   K9-वज्रमध्ये मल्टीपल राउंड्स मल्टीनेशनल इफेक्ट (MRSI)मोडमध्ये शेल्स (गोळे) ठेवण्याची क्षमता आहे. MRVI मोडमध्ये, K-9 वज्र फक्त 15 सेकंदात तीन गोळे उडवू शकतो. जास्तीत जास्त गोळ्याची क्षमता 104 राउंड फायर आहे. या तोफेचे वजन 50 टन आहे आणि ते 50 किलोमीटर अंतरापर्यंत 47 किलो गोळे फायर करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या