JOIN US
मराठी बातम्या / देश / एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, विहिरीत सापडले मृतदेह; मृतांमध्ये दोन महिला गर्भवती

एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, विहिरीत सापडले मृतदेह; मृतांमध्ये दोन महिला गर्भवती

एकाच कुटुंबातील पाच जणांची (Five members) हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरच्या दुदू शहरात (Dudu in Jaipur) तीन महिला आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजस्थान, 28 मे: राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur)एकाच कुटुंबातील पाच जणांची (Five members) हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरच्या दुदू शहरात (Dudu in Jaipur) तीन महिला आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली, त्यानंतर विहिरीतून एकूण 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या तीनपैकी दोन महिला गर्भवती होत्या. प्राथमिक माहितीनुसार, सासरच्या लोकांनी हुंड्याच्या लालसेपोटी तिन्ही महिला आणि दोन मुलांची हत्या केली आहे. ज्या महिलांचे (सर्व बहिणी) मृतदेह सापडले त्यात कालुदेवी आणि तिच्या दोन बहिणींचा समावेश आहे. एकतर्फी प्रेमातून 6 मुलांच्या आईवर चाकूनं वार, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद   कालू देवी यांच्या दोन मुलांचे (एक चार वर्षांचे आणि दुसरे 27 दिवसांचे) मृतदेहही सापडले आहेत. त्याचवेळी तिच्या दोन बहिणी ममता देवी आणि कमलेश यांचेही मृतदेह शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर याच विहिरीतून सापडले आहेत. कालू देवीच्या दोन्ही बहिणी गरोदर होत्या आणि त्या कधीही मुलाला जन्म देऊ शकणार होत्या. एकाच वेळी पाच मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवार संध्याकाळपासून 3 सख्ख्या बहिणींसह त्यांची दोन मुलेही बेपत्ता होती. एका खोलीत तडजोडीची चर्चा, दुसऱ्या खोलीत बलात्कार पीडितेनं घेतला मोठा निर्णय रिपोर्टनुसार, पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या बहिणीला मारहाण करून तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती. ती काही वेळा दिवसांपूर्वीच रुग्णालयातून परतली होती आणि सासरच्यांकडून सतत हुंड्याची मागणी होत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या