JOIN US
मराठी बातम्या / देश / 'आयटम नंबर 1, 2, 3....' भाजप उमेदवार इमरती देवींवरील वादग्रस्त विधानावर कमलनाथांचे स्पष्टीकरण

'आयटम नंबर 1, 2, 3....' भाजप उमेदवार इमरती देवींवरील वादग्रस्त विधानावर कमलनाथांचे स्पष्टीकरण

आयटम या टिप्पणीमुळे कमलनाथ यांच्यावर भाजपकडून टीका केली जात आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बिहार, 19 ऑक्टोबर : भाजप महिला नेता इमरती देवी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणीवरुन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर चहुबाजूंनी टिप्पणी केली जात आहे. अखेर आज एका सभेदरम्यान त्यांनी त्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मी कोणाचा अपमान केला नाही. ते पुढे म्हणाले की, मी नाव विसरलो होतो. मात्र शिवराज सिंह चौहान निमित्त शोधत आहे. पण कमलनाथ कधी कोणाचा अपमान करीत नाही. कमलनाथ यांनी एका निवडणूक सभेत म्हणाले की, मी जे काही म्हणालो, तो अपमान नव्हता. मी असं काही ठरवून म्हणालो नव्हतो..मला त्या व्यक्तीचं नाव लक्षात येत नव्हतं. ज्याचं नावच लक्षात नाही त्यांना काय म्हणू मी…आज ज्याप्रमाणे आपल्या व्यासपीठावर आयनम नंबर 1 आहेत राजनारायण सिंह, आयटन नंबर 2 अजय सिंहजी…या यादीत आयटन नंबर 1, आयटम नंबर 2..आयटम नंबर 3 असं नावं आहेत. मात्र शिवराज सिंह तर कारण शोधत आहे…कमलनाथ कधी कोणचा अपमान करीत नाही…मी सत्यासह पोल खोलतो. कमलनाथ पुढे म्हणाले की, तुमच्याजवळ बोलायला काही नाही, म्हणून काहीना काही बोलत असता. तुम्ही म्हणता कमलनाथ कोका कोला पितो..हो मी पितो कोका कोला..जर कोका कोला पिणं बंद केलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या थांबले की तरुणांना रोजगार मिळेल? ही भारतीय जनता पक्षाची स्थिती आहे. हे ही वाचा- खासगी नोकरदारवर्गासाठी मोठी बातमी; दिवाळीपूर्वी सरकार आणणार नवी योजना

काल काय म्हणाले कमलनाथ मध्य प्रदेशातील डबरामध्ये काँग्रेस उमेदवार सुंरेंद्र राजेश यांच्या प्रचारासाठी आलेल्या कमलनाथांनी भाजप उमेदवार इमरती देवी यांना आयटम म्हटले. कमलनाथ म्हणाले की, सुरेश राजेश आपले उमेदवार आहे..सरळ स्वभावाचे आणि अत्यंत साधे आहेत. हे त्यांच्याप्रमाणे नाहीत..काय नाव आहे त्यांचं? (लोक ओरडतात इमरती देवी) मी काय त्यांचं नाव घेऊ, तुम्ही तर माझ्याहून अधिक ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला हवं होतं. हे काय आयटम आहे..हे काय आयटम आहे (हसतात)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या