JOIN US
मराठी बातम्या / देश / सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करणारा आरोपीचा मृत्यू, रेल्वे ट्रॅकवर मिळाला मृतदेह

सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करणारा आरोपीचा मृत्यू, रेल्वे ट्रॅकवर मिळाला मृतदेह

6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) आणि हत्येतील (Murder) मुख्य आरोपी आज रेल्वे ट्रॅकवर मृतावस्थेत आढळला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 16 सप्टेंबर: तेलंगणाच्या हैदराबाद (Hyderabad) जिल्ह्यात येथे 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) आणि हत्येतील (Murder) मुख्य आरोपी आज रेल्वे ट्रॅकवर मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्यानं शहरातील लोकांमध्ये प्रचंड संताप होता. प्रत्येकजण आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत होते. रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह या प्रकरणातील आरोपीचा आहे, असं तेलंगणाच्या डीजीपीनं स्पष्ट केलं. तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी आदल्या दिवशी एक निवेदन दिलं होतं. निवदेनात म्हटलं होतं की, आम्ही आरोपीला लवकरात लवकर शोधून काढू आणि त्याचा एन्काऊंटक करु. वारनगलमध्ये रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह सापडला आहे. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी मृतदेहाची तपासणी केली आणि हातावर बनवलेल्या टॅटूच्या आधारे बलात्कार-हत्या घटनेतील आरोपी असल्याचं आढळून आलं. कन्हैया कुमार धरणार काँग्रेसचा हात? Rahul Gandhi यांची घेतली भेट; जिग्नेश मेवाणीही पक्षप्रमुखांच्या संपर्कात तेलंगणाच्या DGPनं ट्विट करून सांगितलं की, सिंगारेनी कॉलनीत बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. हे घनपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येते. मृतदेहावर सापडलेल्या खुणांच्या आधारे आरोपीची पुष्टी झाली आहे. नेमकी घटना काय? 9 सप्टेंबर रोजी तेलंगणाच्या हैदराबादमध्ये 6 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. पीडित अल्पवयीन मुलीवर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. मुलीच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय आरोपीवर पोलिसांना संशय होता. 14 सप्टेंबरला पोलिसांनी आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवलं होतं. आरोपीला पकडण्यात जो कोणी त्याला मदत करेल त्याला 10 लाखांचे बक्षीस दिले जाईल असे पोलिसांनी म्हटलं होतं. चालत्या-फिरत्या बाईकच्या पेट्रोल टाकीचा स्फोट, चालक गंभीर जखमी   10 सप्टेंबर रोजी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याच्या एक दिवसानंतर, पोलिसांनी त्याचे फोटो व्हायरल केले होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींची पोस्टर्स शहराच्या भिंती, बस आणि ऑटो रिक्षांवर लावले होते. आरोपी कोणत्याही प्रकारे दुसऱ्या राज्यात जाऊ नये म्हणून सीमेवर वाहनांची तपासणी करण्यात आली. आरोपीची ओळख 30 वर्षीय राजू अशी आहे. जो गुन्हा केल्यापासून फरार होता. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी 9 विशेष पथके तयार केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या