उत्तर प्रदेश, 12 फेब्रुवारी: देशातील अनेक शहरांमध्ये हिजाबच्या (hijab Controversy) वादाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, यूपीच्या अलीगढमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्या (Samajwadi Party leader) आणि महानगर अध्यक्षा रुबिना खानुम (Rubina Khanum) यांनी कर्नाटकच्या हिजाब प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रुबिना खानुम म्हणाल्या की, हिजाबवर हात टाकणाऱ्यांचे हात कापून टाकू. हिजाबच्या वादावर सपा नेते काय म्हणाले? सपा नेत्या रुबिना खानुम म्हणाल्या की, भारत हा विविधतेचा देश आहे. कपाळी टिळक असो की पगडी, बुरखा असो की हिजाब, हे सर्व आपल्या संस्कृतीचा आणि परंपरांचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्यावर राजकारण करून वाद निर्माण करणे म्हणजे नीचतेची उंची आहे. महिलांना कमकुवत समजण्याची चूक करू नका. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. बहिणी-मुलींच्या स्वाभिमानाला हात घातला तर झाशीची राणी आणि रजिया सुलतान बनून त्यांचे हात कापून टाकू. हिजाबच्या वादावर सीएम योगींचा सल्ला त्याचवेळी सीएम योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सांगितले की, देश शरियाने नव्हे तर संविधानाने चालेल. प्रत्येक संस्थेला स्वतःचा ड्रेस कोड तयार करण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेनुसार यंत्रणा चालेल. झी न्यूजनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. हिजाबचा वाद कसा सुरू झाला? हिजाबचा वाद कर्नाटकातील (Karnataka) उडुपीपासून (Udupi) सुरू झाला होता. येथे काही विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश करण्यास विरोध केला आणि त्यांनी भगवा रंगाची गमछा परिधान करून महाविद्यालयात येण्यास सुरुवात केली. नंतर उडुपीच्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असेच घडले. कर्नाटकात 16 तारखेपर्यंत महाविद्यालये, विद्यापीठे बंद कर्नाटकातील (Karnataka) हिजाब वादाच्या (hijab controversy) पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने सर्व पदवी महाविद्यालये, विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रम संस्था 16 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी उच्च शिक्षण विभागाने 9 ते 11 फेब्रुवारीदरम्यान या शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र दरम्यानच्या काळात अकरावी आणि बारावीच्या शाळा बंद करण्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. दरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात मुख्यमंत्र्यांनी सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.