नवी दिल्ली, 30 जून: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनंही चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यातच आता रेक्टल ब्लीडिंगचाही धोका वाढताना दिसतोय. ब्लॅक फंगसनंतर आता कोरोना रुग्णांमध्ये धोकादायक रेक्टल ब्लीडिंगचाही **(Rectal Bleeding)**धोका वाढत आहे. राजधानी दिल्लीच्या दोन रुग्णालयात गेल्या काही दिवसांमध्ये पाच रुग्ण आढळून आले. त्यातल्या एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गंगाराम रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर 20 ते 30 दिवसांनंतर रेक्टल ब्लीडिंगची त्रास होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत रेक्टल ब्लीडिंगची समस्या कमी प्रतिकारशक्ती असलेल्या कर्करोग, एड्सनं ग्रस्त रूग्णांमध्येच दिसून आली होती. रुग्णालयाच्या मते, भारतात प्रथमच कोविडच्या रुग्णांमध्ये रेक्टल ब्लीडिंग होण्याच्या घटना घडल्या आहेत. रेक्टल ब्लीडिंग हे सायटोमेगालो व्हायरसशी संबंधित आहे. रेक्टल ब्लीडिंगचा त्रास होताना रूग्णांच्या पोटात दुखणे, मलस्त्रावाच्या रक्त जाणे यासारख्या समस्या उद्भवतात. हेही वाचा- जन्मदात्या बापाकडूनच तीन मुलांच्या हत्येचा प्रयत्न, आईस्क्रिममधून दिलं विष गंगाराम येथील इंस्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएंटरोलॉजी अॅन्ड पॅन्क्रियाटिकोबिलरी सायन्सेसचे चेअरमन प्रोफेसर अनिल अरोरा यांनी सांगितलं की, सायटोमेगालो व्हायरसशी संबंधित असे संक्रमण भारतीय लोकसंख्येच्या 80-90 टक्के आधीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत आहे, ज्यामुळे त्याची लक्षणे दिसत नाहीत. दरम्यान ज्यांची प्रतिकारशक्ती एखाद्या कारणामुळे कमकुवत होते, त्यानंतर त्यांच्यात अशी लक्षणे दिसू लागतात. गंगाराम रुग्णालयात एकाचा मृत्यू गंगाराम रुग्णालयात पाच रुग्ण दाखल झालेत. हे सर्व रुग्ण 30- 70 वयोगटातील आहे. सर्व दिल्ली-एनसीआरचे आहेत. यातील दोन रुग्णांना खूप त्रास होत होता. यातल्या एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याचं लवकरच ऑपरेशन करण्यात येणार आहे. हेही वाचा- Covaxin लसीवर अमेरिकेचीही मोहोर, अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर ठरते प्रभावी मूलचंद रुग्णालयात एक रेक्टल ब्लीडिंगचा रुग्ण दाखल झाला होता. 55 वर्षीय रुग्णानं सांगितलं की, आपण गेल्या तीन महिन्यांपासून 4 ते 5 ग्लास काढा पित होतो. मार्चपासून रुग्णालयात रेक्टल ब्लीडिंगचे बरेच रुग्ण आले.