डाबेटीज पेशंटला कच्च दुध पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यात पामिटोलिक ऍसिड असतं. ज्यामुळे इन्सुलिन व्यवस्थित काम करतं.
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Prices) किंमत वाढत असताना, आता दुधाच्या किंमतीही शंभरी पार करण्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान ट्विटरवर एक हॅशटॅग 1मार्च_से_दूध_100_लीटर ट्रेंडमध्ये आहे. या ट्रेंडमधून, 1 मार्चपासून दुधाच्या किंमती 100 रुपये प्रति लीटर होणार असल्याचा दावा केला जात आहे. ही बातमी सिंधु बॉर्डरवर (Singhu Border) प्रदर्शन करणारे शेतकरी नेते मलकीत सिंहद्वारा सादर केला जात आहे. न्यूज 18 लोकमत या बातमीची पुष्टी करत नाही. दुधाच्या किंमती 100 रुपये होणार असल्याची ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दूध 100 रुपये लीटर होण्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत #1मार्च_से_दूध_100_लीटर हा हॅशटॅग 54 हजारहून अधिक वेळा ट्विट करण्यात आलं आहे. यात एका वृत्तपत्राचं कटिंग व्हायरल होत आहे. ज्यात किंमती वाढल्या असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हायरल बातमीत असं लिहिण्यात आलं आहे की, सिंधु बॉर्डरवर आंदोलन करणारे संयुक्त किसान मोर्चाच्या अधिकाऱ्यांनी दुधाचे दर वाढवण्याविषयी सांगितलं आहे. भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख मलकीत सिंह यांनी, 1 मार्चपासून शेतकरी दुधाचे दर वाढवतील असं सांगितलं आहे. सध्या 50 रुपये किंमतीने विकलं जाणारं दूध दुप्पट किंमतीने म्हणजे 100 रुपये लीटरने विकलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारने डिझेलचे दर वाढवून शेतकऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचं मलकीत सिंह यांनी म्हटलं आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीच्या तुलनेत दुधाच्या किंमतीची यादी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुधाचे नवे रेट सांगण्यात आलं आहेत. व्हायरल यादीमध्ये आधार मूल्य, चारा टॅक्स, गोबर टॅक्स, लेबर चार्ज, शेतकरी लाभासारख्या गोष्टी सामिल आहेत. शेतकऱ्यांकडून याप्रकरणी अधिकृतपणे कोणतंही विधान करण्यात आलेलं नाही.