JOIN US
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी! Power Plant मधील लिफ्ट तुटली, 80 मीटरवरून खाली पडून MD सह चौघांचा मृत्यू

मोठी बातमी! Power Plant मधील लिफ्ट तुटली, 80 मीटरवरून खाली पडून MD सह चौघांचा मृत्यू

थर्मल पॉवर प्लँटमधील (Thermal Power Plant) लिफ्ट (Lift) अचानक तुटल्याने त्यातून खाली कोसळून चौघांचा मृत्यू (Death of four) झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 26 ऑगस्ट : थर्मल पॉवर प्लँटमधील (Thermal Power Plant) लिफ्ट (Lift) अचानक तुटल्याने त्यातून खाली कोसळून चौघांचा मृत्यू (Death of four) झाला आहे. झारखंडमधील कोडरमामधील (Kodarama) थर्मल पॉवर सब स्टेशन प्लँटमध्ये (KTPS) गुरुवारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लिफ्टमध्ये असणारे कंपनीचे एमडी आणि 3 इंजिनिअर यांचा मृत्यू झाला, तर चिमनी तयार करण्याच्या कामावर असणारे सुमारे 100 मजूर वरच अडकून पडले. जयनगर परिसरात असणाऱ्या थर्मल पॉवर सबस्टेशनमध्ये श्री विजया कन्स्ट्रक्शन्स ही कंपनी 150 मीटर उंच चिमनी तयार करण्याचं काम करत होती. त्यातील 80 मीटरचं काम पूर्ण झालं होतं. या कामाचा आढावा घेण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि तीन इंजिनिअर लिफ्टमधून वर गेले होते. काम संपवून खाली परत येत असताना लिफ्टची तार तुटली आणि ही लिफ्ट तब्बल 80 मीटर खाली कोसळली. या दुर्घटनेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. कृष्ण प्रसाद कोदाली (वय 42), प्रोजेक्ट मॅनेजर नवीन कुमार (वय 30), कर्नाटकमधील इंजिनिअर कार्तिक सागर (वय 30) आणि डॉ. विनोद चौधरी (वय 50) हे खाली कोसळले. एवढ्या उंचीवरून कोसळल्यामुळे ते रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडल्याचं चित्र होतं. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र वाटेतच या सर्वांचा मृत्यू झाला. कामगार पडले अडकून या चिमनीच्या कामावर असणारे सुमारे 100 कामगार लिफ्ट तुटल्यामुळे वर अडकून पडले. त्यांना CISF च्या जवानांनी एक-एक करून बाहेर काढलं. या घटनेनंतर प्लँटमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेकजण घाबरल्यामुळे आरडाओरडा आणि धावपळ सुरू झाली होती. हे वाचा - काबूलसाठी केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, लवकरच आखणार धोरण नुकसान भरपाई देण्याची मागणी या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. कंपनीच्या तांत्रिक चुकीमुळे हा अपघात झाला असल्यामुळे कामगारांना नुकसान भरपाई मिळायलाच हवी, अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या