लखनऊ दिल्ली 21 ऑगस्ट : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं निधन झालं **(Kalyan Singh Passes Away)**आहे. 4 जुलैपासून कल्याण सिंह पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल होते.आयसीयूमध्ये चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. पण नंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली, तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. मेहबुबा मुफ्तींची जीभ घसरली, तालिबानचं उदाहरण देत मोदी सरकारला इशारा
21 जूनला ब्लड शूगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु होते. 17 जुलैला अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हापासून ते सतत ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. मात्र, आज उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लखनऊ पीजीआयनं शनिवारी रात्री उशिरा याबाबत माहिती देताना सांगितलं, की उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. बऱ्याच काळापासून ते आजारी असल्यानं आणि हळूहळू अनेक अवयव निकामी होत गेल्यानं आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसंच राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपालही होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच भाजपच्या मंत्री आणि खासदारांसह कार्यकर्त्यांनीही हळहळ व्यक्त केली.