नवी दिल्ली 28 ऑगस्ट : नोएडामधील उंच ट्विन टॉवर पाडण्यात येणार असल्याचं समोर आल्यापासून सगळ्यांचंच या घटनेकडे लक्ष लागलेलं होतं. अखेर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी हा टॉवर पाडण्यात आला आहे. 3600 किलो पेक्षा जास्त स्फोटकं वापरून ही इमारत काही सेकंदात जमीनदोस्त करण्यात आली आहे. ही इमारत पाडतानाचा पहिला व्हिडिओ आता समोर आला आहे. हा टॉवर पाडल्यानंतर आसपासचा संपूर्ण परिसर भूकंपासारखा हादरला. या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर आसपासच्या परिसरामध्ये धुळींचं साम्राज्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
टॉवरमधील स्फोटकांचा स्फोट करण्यासाठी 100 मीटर अंतरावर नियंत्रण कक्षात एक स्विच करण्यात आलं होतं. याठिकाणी फक्त 6 लोक होते. याशिवाय 500 मीटरच्या परिघात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती. मीडियादेखील इमारतीपासून 600 मीटर अंतरावर राहाण्यास सांगण्यात आलं होतं 32 मजले, 9 सेकंद! काहीच मिनिटांत इतिहासजमा होणार ट्विन टॉवर, इथे पाहा LIVE या पाडकामादरम्यान नोएडा परिसरात 560 पोलीस, 100 राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या (NDRF) टीम तैनात करण्यात आल्या होत्या. हे टॉवर कोसळताना घटनास्थळी एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही हजर होते. पाडण्यात आलेल्या या टॉवर्सची उंची १०० मीटर लांब म्हणजेच कुतुबमिनारापेक्षाची जास्त होती. नोएडा प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रितू माहेश्वरी यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही टॉवरमधून सुमारे 60 हजार टन मलबा बाहेर आला आहे. याची विल्हेवाट लावण्यासाठी जवळपास 3 महिने लागणार आहेत