गाझियाबाद (उत्तरप्रदेश), 12 एप्रिल : गाझियाबादच्या (Ghaziabad) इंदिरापूरम मधील कनावनी गावात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 40 गायींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Cow Died in Fire) वास्तविक ही आग एका झोपडपट्टीला लागली होती, जिथे एक कचऱ्याचे गोदाम होते आणि त्याच वस्तीला लागून असलेल्या गोशाळेत ही आग पसरली. ही आग इतकी भीषण होती की, येथील गायींना बाहेर काढता आले नाही. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाला.
गाझियाबाद पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच प्रशासनाने देखील ही झोपडपट्टी कोणत्या परिस्थितीत वसली, याचीही चौकशी केली जाईल. कारण येथील लोकांचे म्हणणे आहे की, हे लोक कचरा जमा करण्याचे काम करायचे तसेच त्यांनी एक कचऱ्याचा गोदामही बनवला आहे. याप्रकरणी पोलीस आणि प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार केली गेली आहे. दरम्यान, या आगेत गहूचे शेत जळाले आहे. काय आहे प्रकरण? गाझियाबाद शहराच्या पोलीस उपअधीक्षक (एएसपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटनेची माहिती पोलिसांना सोमवारी दुपारी जवळपास एक वाजून 10 मिनिटांच्या सुमारास मिळाली. यानंतर अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. त्यांच्या 15 गाड्यांनी जवळपास एक तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग सुरुवातीला झोपडपट्टीला लागली. यानंतर ती गोशाळेपर्यंत पोहोचली. हेही वाचा - बापरे! ‘हे’ आहे जगातील सर्वात शुद्ध आणि महाग मीठ; किंमत ऐकून तुमच्याही तोंडाची जाईल चव याचवेळी ज्या गायी बांधून ठेवण्यात आल्या होत्या, त्या तिथून निघू न शकल्यामुळे त्यांचा अधिक प्रमाणात झाला आहे. यावेळी गोशाळेत एक कर्मचारी उपस्थित होता. त्याने अन्य लोकांच्या मदतीने काही गायींना बाहेर सोडण्यात आले. यावेळी 20 गायी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच याठिकाणी काही गॅस सिलेंडर पण होते, ज्यांचा स्फोट झाला आणि आगीने आणखी तीव्र रुप धारण केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. गोशाळेचे संचालक काय म्हणाले? गोशाळेचे संचालक सूरज पंडित यांचे म्हणणे आहे की, त्यांना दुपारी फोनच्या माध्यमातून सूचना मिळाली की, गोशाळेत आग लागली आहे. ते म्हणाले की, गोशाळेत जवळपास 100 गायी होत्या. यातील 40 गायींचा मृत्यू झाला आहे. ते हे गोशाळा 3 वर्षांपासून चालवत आहेत. त्यांनी गोशाळेच्या जमिनीला भाड्याने घेतल्याचे सांगितले. जवळच्या कचऱ्याच्या गोदामामुळे ही आग लागल्याचे त्यांनी सांगितले.