JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : तुम्हीच तेव्हा मुख्यमंत्री होतात...काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर फारुख अब्दुल्ला संतापले, म्हणाले..

VIDEO : तुम्हीच तेव्हा मुख्यमंत्री होतात...काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर फारुख अब्दुल्ला संतापले, म्हणाले..

Farooq Abdulla on Kashmiri Pandit’s Issue : व्हिडिओमध्ये फारुख अब्दुल्ला संसदेतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरलं. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सर्वप्रथम आयोगाच्या स्थापनेबाबत उत्स्फूर्तपणे भाष्य केलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मार्च : चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट आल्यापासून काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर (Kashmiri Pandit’s Issue) देशभरात चर्चा सुरू आहे. काश्मिरी पंडितांना काश्मीर खोर्‍यातून हाकलण्यात आले तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे (National Conference) प्रमुख फारुख अब्दुल्ला हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आज (22 मार्च) फारुख अब्दुल्ला (Farooq Abdulla) यांना या मुद्द्यावर विचारणा केली. याविषयीचे प्रश्न ऐकून फारुख अब्दुल्ला संतापले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचं (भाजप) नाव न घेता आव्हान दिले की, ‘त्यांना सत्य जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आयोग स्थापन करावा. संपूर्ण सत्य बाहेर येईल. हे वाचा -  बीरभूममधल्या जाळपोळीच्या तपासासाठी SITची स्थापना, 10 जणांची झाली जाळून हत्या ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये फारुख अब्दुल्ला संसदेतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरलं. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सर्वप्रथम आयोगाच्या स्थापनेबाबत उत्स्फूर्तपणे भाष्य केलं. ते म्हणाले, ‘मला वाटतं की त्यांनी (भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं) एक आयोग स्थापन करावा. सत्य काय आहे ते त्यांना समजेल.’’ त्यानंतर त्यांच्या त्या काळातील भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत कागदपत्रं उद्धृत करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, ‘मी आधीच सांगितलं आहे की, आयोग स्थापन करा. सत्य बाहेर येईल.’’ त्यानंतर कोणीतरी विचारलं की, कुठेतरी तुमचीही जबाबदारी आहे. त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होता. यावर फारुख अब्दुल्ला (Farooq Abdulla) संतापले आणि रागानं म्हणाले, ‘मी बोललो आहे. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. तुम्ही आयोग बनवा.’ इतक्यात त्यांनी पुन्हा प्रश्न विचारणाऱ्या एका महिला पत्रकाराला प्रश्न खडसावलं, ‘मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. आता तेच प्रश्न करू नका.’ यानंतर ते गाडीत बसून निघून गेले.

संबंधित बातम्या

ते बोलत राहतात, आरोप होत राहतात फारुख अब्दुल्ला संतापले असतानाही त्यांना पुन्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. असं विचारण्यात आलं, ‘भाजप तुमच्यावर आरोप करत आहे.’ तर ते म्हणाले, ‘आरोप होतच राहतात.’ मग पुढचा प्रश्न, ‘तुम्ही मुख्यमंत्री होताच काश्मिरी पंडितांना काश्मीर खोऱ्यातून हाकलून देण्याची प्रक्रिया सुरू झाली, असं बोललं जात आहे?’ यावरही त्यांनी तेच पुन्हा म्हटलं, ‘ते बोलत राहतात.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या