मुरादाबाद, 9 सप्टेंबर : मुलीचं शिक्षण किंवा लग्नाच्या खर्चासाठी हुंड्यासाठी किंवा उपचारासाठी जमीन विकल्याचं ऐकलं किंवा वाचलं असेल. पण चक्क एका देवी भक्तानं आपल्या कुटुंबाची 3 एकर जमीन विकून त्यातून आलेल्या पैशांमधून भव्य जगरण सोहळा आयोजित केला. ते पैसे देवीसाठी समर्पित केले. यावेळी देवीचा जागर करण्यासाठी खास अनुराधा पौडवाल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हा सोहळा पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती. या सोहळ्यात चर्चा होती ती जमीन विकून देवीसाठी केलेल्या जागरणाची. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना जास्त फौज मागवावी लागली. पेशानं शेतकरी असलेल्या चंद्र प्रकाश हे देवीचं खूप मोठे भक्त आहेत. त्यांना जागरण सोहळा आयोजित करायचा होता. यासाठी पैशांची कमतरता होती. पैशांची चणचण असल्याने सोहळा करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे वडिलोपार्जित 120 बिघा जमिनीपैकी 15 बिघा जमीन त्यांना विकली. ही जमीन विकून त्यांना 45 लाख रुपये मिळाले. या पैशांमधून त्यांना जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी खास अनुराधा पौडवाल यांना आमंत्रण देण्यात आलं. हेही वाचा-‘मुलांना धोतर नेसायचंय, परवानगी द्यायची का?’ हिजाब वादात सुप्रीम कोर्टाचा सवाल अनुराधा पौडवाल यांनी या कार्यक्रमात भजन गायलं. लोकही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. मात्र सगळीकडे चर्चा या शेतकऱ्याची होती. कारण त्याने जमीन विकून हा कार्यक्रम आयोजित केला होता. हे सगळं देवी मातेच्या आशीर्वादाने मिळालं आहे. त्यामुळे माता देवीसाठी खर्च केलं तर चिंता कसली असंही शेतकरी चंद्रप्रकाश म्हणाले. अनुराधा पौडवाल यांच्या आगमनामुळे परिसरातील लोकांमध्ये उत्साह वाढल्याचं भाजप नेते ठाकूर अजय प्रताप सिंह यांनी सांगितलं. जागरणमध्ये अनुराधा पौडवाल आल्याची बातमी कळताच एवढा जमाव जमला की कोतवाली पोलिसांना मदत मागावी लागली. फौजफाट्यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री शांततेत जगरहाट पार पडला. आजूबाजूच्या गावातील लोकही इथे जमले होते. ही घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथली आहे. या घटनेची सध्या खूप चर्चा सुरू आहे.