मुंबई 7 मे : सध्या देशभरात कोरोनाचा प्रकोप (Corona pandemic) इतका वाढला आहे की, दररोज वाईट बातम्या येऊ लागल्या आहेत. दिवसागणिक परिस्थिती खालावत आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सेलिब्रिटी, कलाकारांपासून ते अगदी सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या सर्वांना कोरोनाने घेरलं आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध सतार वादक पंडित देबू चौधरी (Pandit Debu Chaudhuri) यांचं निधन झालं होतं. त्याचा मुलगा प्रतिक यांनी स्वत: त्याची सोशल मीडियावरून माहिती दिली होती. पण आता प्रतिक यांचं देखील कोरोनाने निधन झालं आहे. 1 मे 2021 पंडित डेबू चौधरी यांचं निधन झालं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर यांनंतर त्यांचा मुलगा प्रोफेसर सतारवादक प्रतीक चौधरी (Prateek Chaudhuri) यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
शिल्पा शेट्टीच्या 1 वर्षांच्या मुलीला झाली कोरोनाची लागणत्याला दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. काही दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर कोरोनाशी त्याची झुंज अपयशी ठरली आणि 7 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. संगीत क्षेत्रातून या बापलेकांच्या मृत्यूने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रतिक यांची पत्नी रूना आणि 4 वर्षाची मुलगी रयाना यांनाही कोरोणाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी प्रती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
1 मे ला वडिलांच्या निधनानंतर प्रतिक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. आपल्या पित्याच्या मृत्यूची बातमी दिली होती. दिल्लीतील एका रुग्णालायात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.