कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.
lockनवी दिल्ली, 1 जुलै: जगभरात सध्या कोरोना साथीच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) आणि कोरोनाच्या डेल्टा प्लस (Delta Plus) या अधिक धोकादायक विषाणूची भीती पसरली आहे. काही देशांमध्ये तिसरी लाट आल्याचे संकेत मिळत आहेत. तिथं लॉकडाउन (Lockdown) करण्यात येत असल्याच्याही बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातही तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेलाही वेग देण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अनेक अफवा पसरत असून, पुन्हा लॉकडाउन लागणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. यामुळे जनतेत घबराट पसरत आहे. याला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी पसरत आहेत. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे, मात्र हा फोटो खोटा असल्याचं पीआयबीनं (PIB) स्पष्ट केलं असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. हा फोटो एका न्यूज चॅनलचा स्क्रीन शॉट आहे. यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली असल्याचं लिहिलं आहे. 1 जुलै ते 31 जुलै कडक लॉकडाउन असंही यात लिहिलं आहे.
अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त; ईडीची मोठी कारवाई मात्र हा फोटो खोटा असल्याचं पीआयबीनं ट्विटरवर (Twitter) दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अशी कोणतीही घोषणा पंतप्रधानांनी केलेली नाही. तेव्हा लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि असे दिशाभूल करणारे संदेश पसरवू नयेत असं आवाहन पीआयबीनं केलं आहे. लोकांनी कोविड-19 प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले सर्व सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळावेत, असंही पीआयबीनं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. याधीही अशा अनेक अफवा पसरल्या होत्या. पीआयबीनं त्यामागचं सत्य शोधून जनतेसमोर सादर केलं आहे. देशातील कोरोना संक्रमणाची स्थिती देशात बुधवारी सकाळी आठ वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 45 हजार 951 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर रुग्ण बारे होण्याचा दर 96.92 टक्के झाला आहे. देशात सध्या 5 लाख 23 हजार रुग्ण उपचार घेत असून, गेलया चोवीस तासात 61 हजार 588 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 33 कोटी 57 लाख लोकांना कोरोंना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. डिसेंबरपर्यन्त देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे. त्यादृष्टीनं लसीकरण केंद्रे वाढवणे, जास्तीत जास्त लस पुरवठा करणं यावर भर दिला जात आहे.