JOIN US
मराठी बातम्या / देश / मद्यधुंद व्यक्तीचा तोल बिघडला अन्..., अंगावर काटा आणणारा मृत्यूचा LIVE VIDEO

मद्यधुंद व्यक्तीचा तोल बिघडला अन्..., अंगावर काटा आणणारा मृत्यूचा LIVE VIDEO

LIVE VIDEO: दारू आरोग्यासाठी किती हानीकारक असू शकते, याच एक जीवंत उदाहरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV cameras) कैद झालं आहे. अंगावरून ट्रक (Truck) गेल्यानंतर मद्यधुंद व्यक्ती ओरडूही शकली नाही. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिवनी, 28 जुलै: दारू आरोग्यासाठी किती हानीकारक असू शकते, याच एक जीवंत उदाहरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV cameras) कैद झालं आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या घटनेत संबंधित व्यक्तीला आपला जीव गमवावा (Drunken man Death) लागला आहे. दारुच्या नशेत रस्त्यानं चालत जात असताना, संबंधित व्यक्ती तोल बिघडून रस्त्यावर पडली. दारूच्या धुंदीमुळे त्याला जागेवरून हालताही आलं नाही. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहेत. संबंधित घटना मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील आहे. येथील घंसौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घंसौर नाका परिसरात एक अज्ञात व्यक्ती दारूच्या नशेच्या रस्त्याच्या कडेनं चालला होता. दरम्यान त्याचा तोल बिघडून तो रस्त्याच्या कडेला पडला. पण दारूची नशा इतकी जास्त होती, की त्याला जागेवरून उठताही आलं नाही. त्यामुळे तो व्यक्ती तिथेच झोपी गेला. हेही वाचा- नाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा पण आपण एका मालवाहू अवजड ट्रकच्या समोर झोपलो आहोत, याचं भानही त्याला राहिलं नाही. दुसरीकडे आपल्या ट्रकच्या समोर एक मद्यधुंद व्यक्ती झोपली आहे, याचा थांगपत्ताही ट्रक चालकाला लागला नाही. त्यामुळे संबंधित ट्रकचालकानं अनावधानानं ट्रक मद्यधुंद व्यक्तीच्या अंगावर घातली आहे. ट्रकनं चिरडल्यानं मद्यधुंद अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीच्या अंगावरून अवजड ट्रक जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

हेही वाचा- VIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, घंसौर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी फरार ट्रकचालकाला अटक केली असून संबंधित ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या