मुंबई, 2 जुलै : दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट विमानाच्या (SpiceJet Plane) केबिनमध्ये चारी बाजूनं अचानक धूर येऊ लागला. हा धूर येत होता तेव्हा विमान तब्बल 5 हजार फुट उंचीवर होते. केबिनमधील धूर लवकरच विमानाच्या सर्व भागात पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या विमानाला तातडीनं दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.
दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या विमानात हा सर्व प्रकार घडला. या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यानं दिली आहे. सर्व प्रवासी सध्या दिल्ली विमानतळावरच असून त्यांना दुसऱ्या विमानानं जबलपूरला पाठवण्यात येणार आहे. Nashik Leopard Video : बिबट्यानं घेतला घराच्या बाल्कनीचा ताबा 15 दिवसांमधील दुसरी घटना यापूर्वी 19 जून रोजी पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानानं पेट (spicejet flight patna to delhi caught fire) घेतला होता. विमानाच्या इंजिनाला आग लागली. या विमानात 185 प्रवासी होते. विमानानं उड्डाण घेताच त्यानं पेट घेतला.विमानानं उड्डाण घेताच त्यामधील इंजिनातून धूर बाहेर पडत असल्याचं आढळलं. यानंतर विमान तात्काळ सुरक्षितपणे उतरवण्यात आले होते. त्यानंतर 15 दिवसांमध्ये स्पाईस जेटच्याच विमानाचे पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडींग करावे लागले आहे.