JOIN US
मराठी बातम्या / देश / 'असं कुणीच जिवंत राहणार नाही', खळबळजनक ट्वीट करणाऱ्या 'त्या' डॉक्टरचा कोरोनाने घेतला जीव

'असं कुणीच जिवंत राहणार नाही', खळबळजनक ट्वीट करणाऱ्या 'त्या' डॉक्टरचा कोरोनाने घेतला जीव

दिल्लीतील डॉ. नबीला सादिक (Dr Nabila sadiq) यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 मे: देशात सध्या कोरोनाची (Coronavirus in India) परिस्थिती खूपच भयंकर आहे. अगदी कोरोना रुग्णांची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाही बेड्स मिळेनासे झाले आहेत. त्यांचाही मृत्यू होतो आहे. नुकतंच दिल्लीतील (Coronavirus in Delhi) एका डॉक्टरचाही मृत्यू (Corona positive doctor died) झाला आहे. या डॉक्टरने काही दिवसांपूर्वीच खळबळजनक ट्वीटही केलं होतं. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीतील (Delhi jamia millia islamia university) सहाय्यक प्राध्यापक डॉ. नबीला सादिक (Dr Nabila sadiq) यांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. फरीदाबादमधील एका रुग्णालयात त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला आहे.

संबंधित बातम्या

नबीला सादिक अनेक दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत होत्या. जामियामध्ये एमए करणारे लारेब नियाजी यांनी आज तक शी बोलताना सांगितलं की, डॉ. नबीलाची प्रकृती खराब झाल्याचं समजताच काही मित्रमैत्रिणींसह आम्ही त्यांच्या घरी गेलो होते. त्यांना जामियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना तिथून फरीदाबादच्या फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आलं. हे वाचा -  कोरोना संसर्ग झाल्याच्या भीतीनं प्यायला रॉकेल; चाचणीत झाला वेगळाच खुलासा 2 मे नबीला यांनी खळबळजनक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी कुणीच जिवंत राहू शकणार नाही, असं म्हटलं होतं. कोरोनाची सद्यस्थिती पाहता त्यांनी हे ट्वीट केलं होतं. ‘अशा परिस्थितीत किमान दिल्लीत तरी कुणीच जिवंत राहू शकणार नाही’, अशी पोस्ट त्यांनी ट्विटरवर केली होती. 4 मे रोजी त्यांनी पुन्हा ट्वीट केलं होतं आणि आपल्यासाठी आयसीयू बेडही मागितला होता. हे वाचा -  भारतात फक्त 2 टक्के लोकांनाच कोरोनाची बाधा, पण… दरम्यान नबीला यांच्या आई आणि आणि वडिलांनाही कोरोना झाला होता. त्यांचे वडील कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर आईचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं.  त्यांच्या आईवरही दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नबीला यांनाही सांगितलं नव्हतं. कारण तिची प्रकृती गंभीर होती, असं नियाजी यांनी सांगितंल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या