JOIN US
मराठी बातम्या / देश / शिवसेनेवरच संकट टळलं, दिल्ली कोर्टाचा मोठा दिलासा, मशाल धगधगतीच राहणार!

शिवसेनेवरच संकट टळलं, दिल्ली कोर्टाचा मोठा दिलासा, मशाल धगधगतीच राहणार!

समता पार्टीने निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला होता

जाहिरात

समता पार्टीने निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला होता

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला धगधगती मशाल चिन्ह मिळाले होते. पण, या पक्षचिन्हावरूनही वाद निर्माण झाला होता. पण, दिल्ली कोर्टाने शिवसेनेला दिलासा दिला आहे. समता पार्टीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. समता पार्टीने निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला होता. यावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने आम्हाला मशालचिन्ह यापूर्वी दिलं होतं. (भाजपला धक्का, शाहू घराण्यातील युवराज शिवबंधनात अडकणार!) हे चिन्ह शिवसेनेला दिलं तर आमच्या मतावर परिणाम होईल असा दावा करत समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय नरूला यांच्यासमोर ही सुनावणी पूर्ण झाली आहे. दिल्ली न्यायालयाने समता पार्टीची याचिका ही फेटाळून लावली आहे.  समता पार्टीने का घेतला होता आक्षेप मशाल हे चिन्ह आमचं आहे. आमचा पक्ष बंद झालेला नाही आम्ही वेळोवेळी निवडणुका लढवत आहोत. आम्ही बिहार निवडणुकीचीही तयारी करत आहोत. ( पुणे तुंबले, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली, मोहोळ यांचे अजितदादांनाच 7 सवाल ) जर आमचं चिन्ह शिवसेनेकडे गेलं तर आम्ही कुठल्या पक्षावर निवडणूक लढवणार ? असा सवाल समता पार्टीने याचिकेमध्ये केला होता. पण, आता कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या