JOIN US
मराठी बातम्या / देश / Cyclone Gulab : गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात, राज्यात 3 ते 4 दिवस पावसाचा इशारा

Cyclone Gulab : गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात, राज्यात 3 ते 4 दिवस पावसाचा इशारा

हे वादळ धडकल्यानंतर राज्यावरही याचे परिणाम जाणवणार आहे. महाराष्ट्रात पुढच्या 3ते 4 दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात

हे वादळ धडकल्यानंतर राज्यावरही याचे परिणाम जाणवणार आहे. महाराष्ट्रात पुढच्या 3ते 4 दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : राज्यावरून कोरोनाचे (corona) संकट आता हळूहळू दूर होत चालले आहे. पण, दुसरीकडे आणखी एक अस्मानी संकट उभे ठाकले आहे. गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) पश्चिम बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे  आंध्र प्रदेश व ओरीसा किनारपट्टीला चक्रिवादळाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD issues alert for West Bengal, Andhra Pradesh and Odisha) दिलेल्या माहितीनुसार, गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे.

उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओरीसा किनारपट्टीला चक्रिवादळाचा इशारा देण्यात आला आहे. आज संध्याकाळी आंध्र प्रदेश व ओरीसा किनारपट्टी, कलिंगपट्नम व गोपालपूरमध्ये धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ धडकल्यानंतर राज्यावरही याचे परिणाम जाणवणार आहे. महाराष्ट्रात  पुढच्या 3ते 4 दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सनरायजर्स हैदराबादसमोर 126 धावांचे सोपे आव्हान; जेसन होल्डरचा पंजाबवर ‘होल्ड’ भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या काही भागात या वादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. पुढील 12 तासात या वादळाचा जोर वाढण्याची शक्यता असून सोमवारनंतर त्याचा धोका कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विध्वंसक ‘गुलाब’ हवामान खात्यानं या वादळाला गुलाब असं नाव दिलं आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे चक्रीवादळ सक्रीय राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आंध्रप्रदेशातील उत्तरेचा भाग आणि ओडिशातील दक्षिणेचा भाग यांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ पुढील काही तासात वादळाचा वेग वाढणार असल्याने हवामान खात्याने आंध्रप्रदेश आणि ओडिशात यलो अलर्ट जारी केला आहे. 26 सप्टेंबरपर्यंत कलिंगपट्टनम भागात यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या