JOIN US
मराठी बातम्या / देश / पॅराशूट रायडिंग करताना जोडप्याचा तुटला दोरखंड; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

पॅराशूट रायडिंग करताना जोडप्याचा तुटला दोरखंड; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

दीव येथील नगवा बीचवर पॅराशूट रायडिंग (parachute riding) करत असताना मोठा अपघात घडला आहे. अचानक दोरखंड तुटल्यानं जोडपं समुद्रात कोसळलं आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दीव, 15 नोव्हेंबर: कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर देशभरातील अनेक नागरिक विविध ठिकाणी पर्यटनाला जात आहेत. गेली जवळपास दोन वर्ष लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंधात राहिल्यामुळे सहकुटुंब फिरायला जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. फिरायला गेल्यानंतर अतिउत्साहातून अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना दीवमध्ये घडली आहे. याठिकाणी पर्यटनास गेलेलं एक जोडपं पॅराशूट रायडिंग करत असताना, त्यांचा दोरखंड तुटल्याची घटना समोर (Couple faces accident while parachute riding) आली आहे. संबंधित सर्व प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित जोडप्याने लाइफ जॅकेट (Life Jacket) परिधान केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. लाइफ जॅकेटच्या मदतीनं संबंधित जोडपं समुद्र किनाऱ्यावर पोहोचलं आहे. संबंधित घटना दीव (Diu) येथील नगवा बीचवर (Nagva beach) घडली आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, अ‍ॅडव्हेंचर एजन्सी आणि पर्यटकांमध्ये मोठा वाद झाला आहे. यानंतर दुर्घटनाग्रस्त जोडप्यानं अ‍ॅडव्हेंचर ग्रुपविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं आहे.

संबंधित बातम्या

या घटनेचा व्हिडीओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. पॅराशूट रायडिंग करत असताना अचानक दोरखंड तुटल्याने अ‍ॅडव्हेंचर बोटीवर मोठा गोंधळ उडाल्याचं संबंधित व्हिडीओत दिसत आहे. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता, एक जोडपं पॅराशूट रायडिंग करताना दिसत आहे. संबंधित पॅराशूटचा दोरखंड बोटीला बांधण्यात आला होता. पण रायडिंग सुरू होताच, अवघ्या मिनिटभरात दोरखंड तुटल्यानं हे जोडपं समुद्रात कोसळलं आहे. हेही वाचा- ट्रॅक्टरच्या धडकेत वाचले पण ट्रकनं चिरडलं; जीवलग मित्रांचा रस्त्यावरच गेला प्राण सुदैवाने त्यांनी यावेळी लाइफ जॅकेट परिधान केलं होतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. संबंधित जोडपं लाइफ जॅकेटच्या मदतीनं किनाऱ्यावर आलं आहे. यानंतर पर्यटक आणि अ‍ॅडव्हेंचर एजन्सीमध्ये मोठा वाद झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी जोडपं पोलीस ठाण्यात गेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या