JOIN US
मराठी बातम्या / देश / डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर भारतात कप्पा व्हेरिएंटची लागण, जाणून घ्या याची लक्षणे

डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर भारतात कप्पा व्हेरिएंटची लागण, जाणून घ्या याची लक्षणे

Kappa Variant In India: देशातील कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं (Delta Plus Variant) संकट आलं.

जाहिरात

वयोवृद्ध व्यक्ती डायबेटीज पेशंटला कोरोना झाल्यास धोका वाढतो आणि याच पेशंटला ब्लॅक फंगस इन्फेक्शनची भितीही जास्त असते. डायबेटीज पेशंटच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं. ऍन्टी-फंगल ट्रिटमेंटनंतरही जास्त काळ औषधोपचार घ्यावे लागतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उत्तर प्रदेश, 10 जुलै: गेल्या वर्षीपासून भारत देश कोरोनासारख्या (Corona Virus) महामारीचा सामना करत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं (Delta Plus Variant) संकट आलं. मात्र आता पुन्हा एकदा भारतासमोरील चिंता वाढणार असल्याचं चित्र आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट उत्तर प्रदेशमध्ये (Uttar pradesh) आढळून आला आहे. आता कोरोनाचा कप्पा (Kappa Variant) नावाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आढळल कप्पा व्हेरिएंट गोरखपूर आणि देवरियामध्ये डेल्टा प्लसचे दोन प्रकरण आढळून आल्यानंतर आता संत कबीर नगरमध्ये एक रुग्ण कोरोनाच्या कप्पा स्ट्रेन पॉझिटिव्ह सापडला आहे. 66 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. जीनोम सिक्वेंसींग अभ्यासादरम्यान या स्ट्रेनबद्दल समजून आलं. हेही वाचा-  पुणेकर तुमची लॉकडाऊनमधून सुटका कधी?,जाणून घ्या जिल्ह्यातील नवे निर्बंध काय आहेत कप्पा व्हेरिएंटची लक्षण खोकला, ताप, घसा खवखवणे यासारखी प्राथमिक लक्षणे कोरोना व्हायरसच्या कप्पा व्हेरिएंटमध्ये आढळून येतात. तसंच इतर सौम्य आणि गंभीर लक्षणंही कोरोना व्हायरससारखीच असतील, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. या व्हेरिएंटबद्दल अद्याप संशोधन सुरु आहे, त्यामुळे यासंबंधीत बरीच माहिती अजून समोर येण्याची शक्यता आहे. हेही वाचा-  डेल्टा + व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असलेला ‘लॅम्बडा’ वाढवणार भारताची चिंता? कसा कराल या व्हेरिएंटपासून बचाव कप्पा व्हेरिएंट ते डेल्टा व्हेरिएंटपासून बचाव करायचा असेल तर मास्क वापरणं हा एकमेव उपाय असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. आवश्यकते असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांपासून अंतर ठेवा. वेळोवेळी आपले हात धुवा आणि आपल्या प्रतिकारशक्तीवर विशेष लक्ष द्या. तर तुम्हाला कोरोना व्हायरसची लक्षणे जाणवत असल्यास, उशीर न करता स्वत: ला आयसोलेट करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या