JOIN US
मराठी बातम्या / देश / देशात कोरोनाचा वाढता धोका, पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक; राज्यांना औषधांचा बफर स्टॉक ठेवण्याच्या सूचना

देशात कोरोनाचा वाढता धोका, पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक; राज्यांना औषधांचा बफर स्टॉक ठेवण्याच्या सूचना

Corona Virus Update News: या बैठकीत मोदींनी देशातील कोविड -19 (COVID-19) च्या परिस्थितीचा आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona Virus) रुग्णांचा वाढलेला आकडा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. या बैठकीत मोदींनी देशातील कोविड -19 (COVID-19) च्या परिस्थितीचा आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. या दरम्यान पीएम मोदींनी आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या वाढवण्याविषयी माहिती दिली. यासह राज्यांना प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा बफर स्टॉक ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

पंतप्रधानांनी पुढील काही महिन्यांसाठी लागणाऱ्या लसींचे उत्पादन, पुरवठा संदर्भातला आढावा घेतला. जगात अजूनही असे अनेक देश आहेत जिथे कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या जास्त आहे. भारतातही, केरळ आणि महाराष्ट्रातून येणारे दैनंदिन आकडे हे दर्शवतात की आपण सध्या कोरोना व्हायरसबाबत निष्काळजीपणा करुन चालणार नाही. हेही वाचा-  भारतावरील दहशतवादी हल्ले वाढणार? अफगाणिस्तानात पाय पसरत आहे TTP संघटना या बैठकीत पंतप्रधानांनी कोविड -19 शी संबंधित सद्य परिस्थितीचा आढावा, आरोग्य यंत्रणेची तयारी, ऑक्सिजनची उपलब्धता आणि लस उत्पादन आणि पुरवठा आणि वितरण या विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींना दिली माहिती बैठकीदरम्यान पंतप्रधानांना देशातील काही भौगोलिक क्षेत्रांसह, सकारात्मक चाचणीचे उच्च दर असलेल्या काही जिल्ह्यांची माहित दिली. तसंच देशातील आठवड्यातील सद्य परिस्थितीबाबतही सांगण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या