JOIN US
मराठी बातम्या / देश / NCERT च्या पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेवरुन वाद; 'छोकरी' या शब्दावर दिलं स्पष्टीकरण

NCERT च्या पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेवरुन वाद; 'छोकरी' या शब्दावर दिलं स्पष्टीकरण

या कवितेत ‘छोकरी’ हा शब्द वापरण्यात आलेला असून, त्या शब्दाला नकारात्मक अर्थच्छटा (Derogatory language) असल्याचं आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मे : ‘एनसीईआरटी’च्या पहिलीच्या हिंदीच्या ‘रिमझिम’ या पाठ्यपुस्तकातल्या ‘आम की टोकरी’ या कवितेत (Controversial Poem) वापरल्या गेलेल्या भाषेवरून (Language) वाद उत्पन्न झाला आहे. या कवितेत ‘छोकरी’ हा शब्द वापरण्यात आलेला असून, त्या शब्दाला नकारात्मक अर्थच्छटा (Derogatory language) असल्याचं आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच, ही अख्खी कविताच चांगली नसून, ती पाठ्यपुस्तकातून काढून टाकावी, अशी मागणी सोशल मीडिया युझर्सनी केली आहे. दरम्यान, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT - एनसीईआरटी) या संस्थेने यावर आपली प्रतिक्रिया ट्विटरवर जाहीर केली आहे. एनसीईआरटीने सोशल मीडिया युझर्सच्या आक्षेपांशी सहमतीही दर्शवली नाही आणि ते खोडूनही काढले नाहीत. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 (NCF) यानुसार विद्यार्थ्यांना स्थानिक शब्दांच्या (Local Vocabulary) वापराची ओळख व्हावी, या उद्देशाने ती कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्याचं एनसीईआरटीने म्हटलं आहे. छह साल की छोकरी, भरकर लाई टोकरी। टोकरी में आम हैं, नहीं बताती दाम है। दिखा-दिखाकर टोकरी, हमें बुलाती छोकरी। हमको देती आम है, नहीं बुलाती नाम है। या कवितेवरून वाद निर्माण झाला असून, ती कविता उत्तराखंडमधले कवी रामकृष्ण शर्मा खद्देर यांनी लिहिली असून, ते बालसाहित्यकार आहेत. हे ही वाचा- Oxygen Express यंत्रणा हाताळताना दिसली Women Power! रेल्वे मंत्र्यांकडूनही कौतुक छत्तीसगड (Chhatisgarh) केडरचे 2009च्या बॅचचे आयएएस अधिकारी अवनीश शरन यांनी 20 मे रोजी पहिल्यांदा या कवितेचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. ‘ये किस ‘सड़क छाप’ कवि की रचना है ?? कृपया इस पाठ को पाठ्यपुस्तक से बाहर करें,’ अशी ओळ सरन यांनी या स्क्रीनशॉटसोबत लिहिली होती. शरन हे राज्याच्या तांत्रिक शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली. अनेकांनी त्यावर शरन यांच्या बाजूने आणि काहींनी विरोधातही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकाने म्हटलंय, की ही कविता बालमजुरीलाही (Child Labour) प्रोत्साहन देते. एकाने म्हटलंय, की या संपूर्ण कवितेला दुहेरी अर्थ (Double Meaning) आहे आणि तो चांगला नाही. मुलांना शाळेत असल्या कविता शिकवल्या जातात हे पाहून धक्का बसल्याचं ट्विट एकाने केलं आहे. एकाने म्हटलंय, की छोकरी या शब्दाला नकारात्मक छटा आहे. एकाने ट्विट केलं, की मुलं ही कविता 2006पासून शिकत आहेत. काही जणांनी असं मत व्यक्त केलं, की छोकरी हा शब्द ग्रामीण भागात सर्रास वापरला जातो. त्यात आक्षेपार्ह काहीही नाही. दरम्यान, एनसीईआरटीने 21 मे रोजी ट्विट करून त्याबद्दलची आपली भूमिका मांडली. तसंच, आगामी पाठ्यपुस्तकं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सादर केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (NEP-2020) तयार केली जात आहेत, असंही एनसीईआरटीने स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या