मदुराई, 31 मार्च : थेनी येथील 14 वर्षांच्या एन. ए. स्नेहन या मुलानं भारताच्या टोकापासून पोहत निघून श्रीलंकेपर्यंत पोहोचण्याचा आणि लगेच परतीच्या प्रवासाला निघून तितकंच अंतर पोहण्याचा विक्रम केला आहे. त्यानं तामिळनाडूतील धनुष्कोडी ते श्रीलंकेतील थलाईमन्नारपर्यंतचं अंतर जाताना आणि परत येताना पोहून पार केलं. यासह त्यानं 57 किलोमीटर सलग समुद्रात पोहून जाण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. हे अंतर पोहण्यासाठी त्याला 19 तास 45 मिनिटं लागली. स्नेहनच्या या विक्रमाची यूआरएफ वर्ल्ड रेकॉर्डच्या बुकमध्ये (Book of URF World Records) नोंद झाली आहे. यासह स्नेहन हे अंतर पोहून जाण्याचा आणि परत येण्याचा विक्रम करणारा सर्वांत तरुण व्यक्ती ठरला आहे. तो सध्या आठवीत शिकत आहे. त्यानं या विक्रमांसह याआधीचा यातील एकेरी अंतर पोहून जाण्याचा 8 तास 25 मिनिटांचा विक्रम मोडला आणि अवघ्या 7 तास 55 मिनिटांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. तसंच, हे संपूर्ण अंतर 28 तास 36 मिनिटांत पोहून पूर्ण करण्याचा विक्रम रोशन अभिसुंदर या श्रीलंकन मुलाच्या नावावर होता. हा विक्रमही स्नेहन यानं मोठ्या फरकानं मोडला आहे. हे वाचा - निष्काळजीपणाची हद्द! 84 वर्षीय वृद्धाला बँकेत कोंडून निघून गेले कर्मचारी, 18 तासांनंतर..
धनुष्कोडी इथं पोहोचल्यावर स्नेहनचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा सत्कार केला. SDAT चे जलतरण प्रशिक्षक एम विजयकुमार यांच्या मते, ‘पाक स्ट्रेट क्रॉसिंग’ कार्यक्रम सोमवारी दुपारी 2 वाजता सुरू झाला. स्नेहननं सोमवारी धनुष्कोडी इथून पोहण्यास सुरुवात केली आणि आयएमबीएल पार करण्यात यश मिळवलं, जिथं श्रीलंकेच्या नौदलाच्या जवानांनी त्यांचं स्वागत केलं आणि संध्याकाळी 5 वाजता एस्कॉर्ट केलं.
हे वाचा - काय सांगता..! काश्मीरच्या 57 वर्षीय शब्बीर हुसेननी केलंय तब्बल 174 वेळा रक्तदान समुद्रातील अनुकूल परिस्थितीमुळं किशोरला तलाईमन्नारच्या प्रवासादरम्यान ही कामगिरी करण्यात मदत झाली. रात्री 9.55 वाजता ते तलाईमन्नार येथे पोहोचले. परतीच्या वेळी समुद्रात काही लाटा उसळू लागल्या. नाहीतर, स्नेहन आणखी लवकर धनुष्कोडीला पोहोचला असता. विजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, सरकारी निरीक्षक, स्नेहनचे आई-वडील आणि प्रशिक्षक यांच्यासह जीवरक्षक बोटीवर 17 जण समुद्रात तरंगणाऱ्या या वीरासोबत होते. तमिळनाडूचे डीजीपी सी. सिलेंद्र बाबू यांनीही स्नेहनचं कौतुक केलं.