शिवसेनेनं निवडणूक आयोगात सुरू असलेल्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे
नवी दिल्ली, 25 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (shivsena) आमदार आणि खासदार फोडून वेगळा गट स्थापन केला आहे. शिवसेनेनं आता कायदेशीर लढाईचा मार्ग स्विकारल्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेनेनं निवडणूक आयोगात सुरू असलेल्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. जिथे शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित आहे, तिथे खरी शिवसेना कोण हे आयोग ठरवू शकत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘खासदारांचा गट फोडल्याप्रकरणी शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे, असं विचारलं असता, एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात. या प्रकरणावर आता मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे पूरग्रस्त भागात मदत मिळत नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे म्हणाले की, ‘राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे नुकसान झालं आहे. त्या भागात जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. मी स्वत: आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. ज्या ज्या भागात पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना नुकसना भरपाई मिळणार आहे, असं आश्वासन शिंदे यांनी दिलं. ( डाळींचा कोणताही पदार्थ करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा; फायदे चारपट वाढतील ) ‘गेल्या 25 दिवसांपासून सरकार स्थापन झाले असून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे, अशी विचारणा केली असता, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे’ असं उत्तर देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे बोलण्याचं टाळलं. ( Numerology: मोठा निर्णय घेण्यासाठी संध्याकाळची वाट पाहा; अंकशास्त्रानुसार भविष्य ) आज राष्ट्रपती महोदयांचा शपथविधी आहे. त्याचा आनंद आहे. आदिवासी महिला भगिनी देशाच्या सर्वोच्चपदावर विराजमान होणार आहे. ही देशवासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आता त्या राष्ट्रपती महोदया आहेत, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यांचं अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.