JOIN US
मराठी बातम्या / देश / दहावी नापासांना रिसॉर्टमधील मुक्काम आणि फ्री बिर्याणी, निराशा दूर करण्यासाठी केरळी उद्योजकांकडून अनोख्या ऑफर्स

दहावी नापासांना रिसॉर्टमधील मुक्काम आणि फ्री बिर्याणी, निराशा दूर करण्यासाठी केरळी उद्योजकांकडून अनोख्या ऑफर्स

बहुतांश विद्याथी विजयाचा जल्लोष साजरा करत असताना नापास झालेल्या विद्यार्थ्यांना काय वाटत असेल, असा विचार करून केरळमधील (Kerala) एका हॉटेल व्यावसायिकानं (Hotel businessman) एक ऑफरची घोषणा केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोची, 16 जुलै : देशभरातील विविध राज्यांमध्ये दहावीचे निकाल (SSC Results) जाहीर झाले. या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं आणि नाममात्र परीक्षा होऊनही काही विद्यार्थी त्यात नापास (Failed) झाले. बहुतांश विद्याथी विजयाचा जल्लोष साजरा करत असताना नापास झालेल्या विद्यार्थ्यांना काय वाटत असेल, असा विचार करून केरळमधील (Kerala) एका हॉटेल व्यावसायिकानं (Hotel businessman) एक ऑफरची घोषणा केली. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या हॉटेलमध्ये ‘फ्री स्टे’ (Free Stay) देण्याची ही घोषणा राज्यभर गाजली आणि इतर काही उद्योजकांनीही अशा ऑफर द्यायला सुरुवात केली. नापासांसाठी ऑफर नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये, यासाठी कोझीकोडेतील सुधीर नावाच्या उद्योजकांनी त्यांच्या रिसॉर्टवर मोफत राहण्याची ऑफर विद्यार्थ्यांना देऊन टाकली. त्यापाठोपाठ कोचीजवळच्या एका बिर्याणी हाऊसनं नापास विद्यार्थ्यांसाठी मोफत बिर्याणी देणार असल्याची घोषणा केली. केरळमध्ये नापास झालेल्या 0.53 टक्के विद्यार्थ्यांना ही ऑफर खुली असल्याचं सांगण्यात आलं. हे वाचा - ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू; देशातलं पहिलं Grain ATM सुरू नापासांची कारणं केरळमध्ये एकूण 4 लाख 21 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. सोपी परीक्षा आणि माफक प्रश्नांमुळे यंदा केरळचा निकाल 99.47 टक्के लागला. तर 0.53 टक्के विद्यार्थी नापास झाले. या मुलांमध्ये काही व्यंग, लर्निंग डिसॅबिलीटी किंवा इतर काही गंभीर समस्या असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळेदेखील अनेक विद्यार्थी मुलभूत गोष्टीदेखील नीट करू न शकल्याचा हा परिणाम असल्याचं मानलं जात आहे. अनेक कुटुबांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असल्याचं शिक्षकांनी सांगितलं आहे. ऑनलाईन शिक्षण ग्रामीण भागातील अनेकांपर्यंत पोहोचू शकलेलं नाही. अनेक भागात इंटरनेट नाही, स्मार्टफोन परवडत नाहीत आणि अनेकांना ते कसे वापरायचे याचंही ज्ञान नसल्याचं वास्तव लॉकडाऊनच्या काळात समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या