बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; शिवप्रेमी आक्रमक
बेळगाव, 18 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Chhatrapati Shivaji Maharaj Statue desecration in Bengaluru) करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बंगळुरू येथे घडलेल्या या प्रकाराचे पडसाद आता राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. (Shivpremi protest in Belgaum after desecration of Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Bengaluru) बेळगावात तणावपूर्ण वातावरण बंगळुरू येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या वृत्ताने शिवप्रेमी चांगलेच संतापले आणि आक्रमक झाले. या घटनेनंतर संतापलेल्या शिवप्रेमींनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात एकत्र येत आंदोलन केलं. तसेच काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला. रात्रीच्या सुमारास शिवप्रेमी चौकात एकत्र आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आज सकाळी शिवप्रेमी एक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देणार आहेत.
वाचा : ‘…पण आमची नियत खोटी नव्हती’, अमित शाह यांचं मोठं विधान महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक कर्नाटकच्या बंगळुरू येथे घडलेल्या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कोल्हापूर येथे संताप व्यक्त केला. तसेच कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. कर्नाटका काही संघटना आणि समाजकंटक हे जाणून बुजून करत असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून येत आहेत. कोल्हापुरातील कर्नाटक व्यावसायिकांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळ दुकाने बंद करुन या घटनेचा निषेधही केला. बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. समाजकंटकांकडून हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं बोलंल जात आहे. गेल्या काही महिन्यांत कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर करणं किंवा अवमान केल्याच्या घटना समोर येतना दिसत आहेत. यापूर्वीही बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला होता आणि त्यावेळीही शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. गेल्यावर्षी बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता. कन्नड संघटना आणि कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषिकांनाही डिवचण्याचा प्रयत्न वारंवार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना बंगळुरूत करण्यात आल्याने मराठी भाषिक आणि शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत.