JOIN US
मराठी बातम्या / देश / 40 कोटींची फसवणूक, आप आमदाराच्या मालमत्तेवर सीबीआयची टाच, राजकीय वर्तुळात खळबळ

40 कोटींची फसवणूक, आप आमदाराच्या मालमत्तेवर सीबीआयची टाच, राजकीय वर्तुळात खळबळ

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्ष म्हणजेच ‘आप’च्या एका आमदाराविरोधात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 मे : पंजाबमधून (Punjab) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्ष (AAP) म्हणजेच ‘आप’च्या एका आमदाराविरोधात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या आमदाराशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापा (raid) टाकला आहे. या छापेमारी मागे 40 कोटी बँक फसवणुकीचा आरोप असल्याची माहिती आता समोर येत आहे. सीबीआयच्या छापेमारीबाबत माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधीच्या विरोधात एवढी मोठी कारवाई होत असल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सीबीआय या प्रकरणी आणखी काय कारवाई करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सीबीआयने 40 कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी पंजाबमधून आम आदमी पार्टीच्या अर्थात आपचे आमदार जसवंत सिंह गज्जन माजरा यांच्याशी संबंधित तीन ठिकाणांवर छापा टाकला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी या छापेमारीबाबत माहिती दिली आहे.

अमरगढच्या आमदारांच्या विरोधात बँक फसवणुकी प्रकरणी संगरुर जिल्ह्यातील मलेर कोटला परिसरात तपास केला जात आहे. संबंधित परिसर हे जसवंत सिंह यांचे गाव आहे. बँक ऑफ बडोद्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ( महागाईविरोधात आंदोलन करणारे भाजप नेते कुठे गले? थोरातांचा सणसणीत टोला ) सीबीआयने लोकप्रतिनिधींर कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदखील अनेक आमदार, नेते आणि लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक नेते, आमदार आणि मंत्री सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विद्यमान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सध्या जेलमध्ये आहेत. याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार, मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीने रेड टाकली आहे. काही दिवसांपूर्वी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपनी आणि घरांवर ईडीने छापा टाकला होता. पंजाबमध्ये आपचं सरकार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन केंद्र सरकारवर टीका केली जाते. आता पंजाबमध्ये आगामी काळात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या