JOIN US
मराठी बातम्या / देश / मोठा दिलासा! आता कोरोनावरील उपचारही होणार कॅशलेस, IRDAI ने विमा कंपन्यांना दिले आदेश

मोठा दिलासा! आता कोरोनावरील उपचारही होणार कॅशलेस, IRDAI ने विमा कंपन्यांना दिले आदेश

विमा नियामक आणि विमा प्राधिकरण (IRDAI) ने कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक मोठी घोषणा केली आहे. आता कोरोना रुग्ण इतर आजारांप्रमाणेच कोरोनासाठीही कॅशलेस उपचाराच्या (Cashless Treatment) सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 एप्रिल : देशभरात कोरोनाचा कहर सतत वाढतोच आहे. दरदिवशी लाखोंच्या संख्येत नवे रुग्ण आढळत आहेत. अनेक लोक कोरोनबाधित होत आहेत. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 3 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात विमा नियामक आणि विमा प्राधिकरण (IRDAI) ने कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक मोठी घोषणा केली आहे. आता कोरोना रुग्ण इतर आजारांप्रमाणेच कोरोनासाठीही कॅशलेस उपचाराच्या (Cashless Treatment) सुविधेचा लाभ घेऊ शकतील. IRDAI ने इन्शुरन्स कंपन्यांना आपल्या ग्राहकांना नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्याचं सांगितलं आहे. यासाठी IRDAI ने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. सरकारनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कसा मिळेल कोरोना रुग्णांना फायदा - IRDAI ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे अशा लोकांना दिलासा मिळेल, ज्यांनी हेल्श इन्शुरन्स केला आहे आणि त्याअंतर्गत कोरोनावर कॅशलेस उपचारही करू इच्छितात. म्हणजेच जर एखादं रुग्णालय एखाद्या रुग्णाला इतर आजारांसाठी कॅशलेस ट्रिटमेंटची सुविधा देत असेल, तर त्या रुग्णालयाला आता कोरोनासाठीही कॅशलेस सुविधा द्यावी लागेल.

(वाचा -  ऑक्सिजन कमतरतेच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; या उपयांकडे विशेष लक्ष द्या )

नियम न पाळल्यास होणार कारवाई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 एप्रिल रोजी IRDAI चे अध्यक्ष एस.सी. खुंटिया यांच्याशी चर्चेदरम्यान, इन्शुरन्स कंपन्यांद्वारा कॅशलेस सुविधा न देण्याबाबत येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचं सांगितलं आहे. जर एखाद्या रुग्णाने तक्रार केली, तर त्या विमा अर्थात इन्शुरन्स कंपनीविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

(वाचा -  LPG Gas Cylinder: 819 रुपयांचा गॅस सिलेंडर फक्त 19 रुपयांत; असा घ्या ऑफरचा फायदा )

विमा घेताना या गोष्टी लक्षात ठेवा - इन्शुरन्स पॉलिसी घेण्याआधी हे जाणून घेणं आवश्यक आहे, की त्यात कोण-कोणते आजार कव्हर केले आहेत. यासाठी हेल्थ इन्शुरन्स स्किमची लिस्ट चेक करा. त्याशिवाय इन्शुरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेश्यो चेक करा. यामुळे कंपनीने इलाजाच्या खर्चाचं आतापर्यंत किती लोकांचं पेमेंट केलं आहे, याची माहिती मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या