JOIN US
मराठी बातम्या / देश / लोडशेडिंगचा असाही फटका! एकाच मंडपात सुरू होती 3 लग्न; लाईट गेल्याने नवऱ्यांचीच अदलाबदल झाली अन् मग...

लोडशेडिंगचा असाही फटका! एकाच मंडपात सुरू होती 3 लग्न; लाईट गेल्याने नवऱ्यांचीच अदलाबदल झाली अन् मग...

तीन बहिणी एकाच मंडपात लग्न करणार होत्या. रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाला. अशात वधूच्या पोशाखात साम्य असल्याने अंधारात चक्क नवऱ्यांचीच अदलाबदल झाली

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 09 मे : मध्य प्रदेशातील विजेचं संकट (Electricity crisis) सतत गडद होत चाललं आहे. लग्नसमारंभाच्या सीझनमध्ये (Wedding Season) असलेल्या या लोडशेडिंगमुळे बऱ्यात समस्या निर्माण होत आहेत. उज्जैनमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे. यात लग्नाच्या वेळी अचानक लाईट गेली आणि याचा परिणाम म्हणजे चक्क नवरीचीच अदलाबदल झाली. ही चूक कळताच पंडितांनी पुन्हा मंदिरात या जोडप्यांना आपल्या खऱ्या वधूसोबत सात फेरे घेण्यास सांगितलं आणि ही चूक सुधारली. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मंडप पाण्याने भरला; तरीही जागेवरुन उठले नाहीत नवरदेव-नवरी, अनोखा VIDEO उज्जैनजवळील डांगवाडा गावातील दोन भावांची वरात अस्लाना गावात पोहोचली होती. इथे तीन बहिणी एकाच मंडपात लग्न करणार होत्या. रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाला. अशात वधूच्या पोशाखात साम्य असल्याने अंधारात चक्क नवऱ्यांचीच अदलाबदल झाली. लग्नसोहळा आटोपून ही वरात डांगवाडा येथे पोहोचली तेव्हा एकच गोंधळ उडाला. तेव्हा लक्षात आलं की मोठ्या भावाशी ज्या नवरीचं लग्न होणार होतं तिने त्याच्या लहान भावासोबत सात फेरे घेतले आहेत. तर मोठ्या भावाने लहान भावासाठी निवडलेल्या मुलीशी लग्न केलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळे मंदिरात पोहोचले. तिथे पंडितांनी वधू बदलून पुन्हा विधिवत सात फेरे घेण्यास सांगितलं. या घटनेला डांगवाडा येथील स्थानिक ग्रामस्थांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, ग्रामीण भागात विजेचं संकट गडद होत चाललं आहे, त्यामुळं लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. दोन भावांची वरात एकाच घरी पोहोचली होती. त्यांचा दोघांचा विवाह दोन सख्ख्या बहिणींसोबत होणार होता, मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने वधूची अदलाबदल झाली. नंतर पुन्हा एकदा मंदिरात फेरे घेऊन चूक सुधारण्यात आली. Ex बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचली गर्लफ्रेंड; नव्या नवरीला पाहून चेहराच पडला, पाहा Video मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागात 6 ते 12 तास वीजपुरवठा खंडित आहे. वीज कपात मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे आमदार महेश परमार यांनी दिला आहे. ग्रामस्थही सतत वीज संकटाशी झुंज देत आहेत. सध्या सीबीएसईच्या परीक्षा सुरू आहेत. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या