JOIN US
मराठी बातम्या / देश / वरमाळेचा कार्यक्रम झाला अन् फेरे सुरु होतानाच नवरीला समजलं नवरदेवाचं सत्य, मंडपातच मोडलं लग्न

वरमाळेचा कार्यक्रम झाला अन् फेरे सुरु होतानाच नवरीला समजलं नवरदेवाचं सत्य, मंडपातच मोडलं लग्न

नवरीने मंडपातच ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला (Bride Refuses to Marry on Wedding Day). याचं कारण हैराण करणारं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 07 मे : अनेकदा लग्नातील अजब आणि विचित्र घटना (Weird Wedding Incidents) समोर येत राहतात. यात कधी नवरी ऐनवेळी लग्नास नकार देते तर कधी स्टेजवरच नवरी आणि नवरदेव एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात करतात. सध्या उत्तर प्रदेशमधूनही असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे. ज्यात नवरीने मंडपातच ऐनवेळी लग्न करण्यास नकार दिला (Bride Refuses to Marry on Wedding Day). याचं कारण हैराण करणारं आहे. नवरीला लग्नाच्या काही वेळ आधीच हे समजलं की नवरदेवाचं आधीही एक लग्न झालं आहे. वाजत-गाजत वरात आली, सगळी तयारीही झाली; वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यानच नवरीने दिला लग्नास नकार दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, नवरदेवाचं सत्य समोर येताच नवरीने लग्नास नकार दिला. यादरम्यान भरपूर गोंधळ झाला. प्रकरण इतकं वाढलं की नवरकडच्या लोकांनी नवरदेवाकडच्यांना गेस्ट हाऊसमध्ये कोंडून ठेवलं. दिवसभर इथे चर्चा सुरु होती आणि काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात होता. कासगंजच्या शेजारील जिल्ह्यातील तिलसाई खुर्द गावातून ही वरात आली होती. नवरदेवाचं हे दुसरं लग्न आहे ही बाब उशिराने उघडकीस आली. हे समोर येण्याआधी वरमाळेचा कार्यक्रमही पूर्ण झाला आणि वरातीत आलेल्या पाहुण्यांनी भोजनही केलं. लग्नाचे सर्व विधी चालू असताना नवरीकडच्या लोकांना कळालं की नवरदेवाचं आधीच लग्न झालं आहे आणि त्याची आधीची पत्नी त्याला सोडून गेली आहे. मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह, भररस्त्यात लोकांच्या देखत तरुणाचा भयंकर शेवट ही बाब नववधूला समजल्यावर तिने लग्नास नकार दिला. मुलीच्या बाजूच्या लोकांनी वराला मारहाणही केली. ही संपूर्ण घटना दुपारी ३ वाजता घडली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नवरदेवाने सांगितलं की, त्याच्या मावशीने हे लग्न जमवलं होतं. नवरदेवाचं म्हणणं आहे की, मावशीने माझ्या जुन्या लग्नाची माहिती नवरीकडच्यांना का दिली नाही, हे मला माहिती नाही. आता वधू पक्षाकडून 2 लाख रुपये आणि सामान परत देण्याची मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या