नवी दिल्ली, 28 जानेवारी : भारताने दुसऱ्यां देशांमध्ये जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या शेड्यूल्ड प्रवासी उड्डाणांवरील निर्बंध (International Passenger Fights) 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे अद्यापही भारत आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. एएनआयने यासंदर्भात ट्वीट केलं आहे. हे प्रतिबंध आंतरराष्ट्रीय कार्गो फ्लाइ्ट्स आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एविएशन (DGCA) यांच्याकडून विशेष परवानगी असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना लागू होणार नाही. DGCA द्वारा जारी केलेल्या परिपत्रात सांगितलं आहे की, प्रतिबंध असले तरी काही विशिष्ट प्रकरणात काही निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड फ्लाइट्सना मंजुरी दिली जाऊ शकते.
हे ही वाचा- कर्नाटकच्या हद्दीतील ‘ती’ 814 गावं का असावी महाराष्ट्रात? जाणून घ्या प्रकरण केवळ काही निवडक फ्लाइ्ट्स सुरू कोरोना व्हायरसच्या महासाथीमुळे 23 मार्च पासून भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवांवर प्रतिबंध लावण्यात आले होते. मात्र विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना वंदे मातरम मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलं होतं. याशिवाय जुलै महिन्यापासून काही ठराविक देशांसोबत दोन पक्षीय एअर बबल कराराअंतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली आहे. भारताने अमेरिका, ब्रिटेन, यूएई, केनिया, भूटान आणि फ्रान्ससह तब्बल 24 देशांसोबत हवाई बबल करार केला आहे. या कराराअंतर्गात दोन देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना त्या देशांच्या एअरलाइन्सद्वारा सुरू केली जाऊ शकते.