लखनऊ 15 मार्च : लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपचे खासदार असणाऱ्या कौशल किशोर यां (Kaushal Kishore) च्या सुनेनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. खासदारांची सून अंकिता यांनी आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Kaushal Kishore’s Daughter-in-law attempt suicide) केला. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ अंकिताला रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी कौशल किशोर यांचा मुलगा आयुष स्वतःवर गोळी झाडून घेतल्याप्रकरणी पोलिसांच्या नोटीसनंतर रविवारी ठाण्यात पोहोचले होते. मडियाव न्यायालयानं रविवारी त्यांना स्टे दिला होता, यानंतर ते मडियाव ठाण्याच पोहोचे. आयुषवर स्वतःवर गोळी चालवून घेण्याचा आरोप आहे. अंकिता छठामिल परिसरात राहातात. मात्र, तीन दिवसांपूर्वी त्या आपल्या नातेवाईकांसोबत इथून गेल्या होत्या. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस अंकिताच्या घरी गेले होते. मात्र, घराला कुलूप लावलं होतं. पोलीस त्यांच्या लोकेशनबद्दल तपास करत होते. अंकितानं म्हटलं, की खासदाराच्या कुटुंबानं स्वतःच्या प्रभावामुळं मला या स्थितीमध्ये आणलं आहे. आता माझ्याकडे काहीही पर्याय नाही. मी प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांकडे गेले, अधिकाऱ्यांकडेही गेले मात्र कोणीही माझं म्हणणं ऐकलं नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली मागणी - अंकितानं पुढे सांगितलं, की त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणी काहीच ऐकायला तयार नाही. न्यायालयाकडूनही मला आशा नाही. मी आयुषसोबत बोलण्यासाठी खासदाराच्या घरी गेले होते. त्याआधी मी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. आयुषच्या घराबाहेर मी उभा होते, मात्र मला कोणीही त्याच्यासोबत बोलू दिलं नाही. मी आयुषची पत्नी आहे. माझी चूक काय आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे. उच्च न्यायालयानं आयुषच्या अटकेला दिली स्थगिती - अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपिठानं आयुषच्या अटकेला स्थगिती दिली आहे. न्यायालयात आयुषनं म्हटलं, की पोलीस त्याला मारहाण करुन तुरुंगात पाठवणार आहेत. त्यामुळे, तो पोलिसांकडे नाही तर न्यायालयासमोर सरेंडर करण्यास तयार आहे. यात आपल्याला काहीही अडचण नसल्याचं आयुषनं म्हटलं. यानंतर न्यायालयानं आयुषच्या अटकेला स्थगिती आणली.