JOIN US
मराठी बातम्या / देश / दमलेल्या पत्नीनं प्रचार करण्यास दिला नकार, भाजपा नेत्यानं केली हत्या! आणि..

दमलेल्या पत्नीनं प्रचार करण्यास दिला नकार, भाजपा नेत्यानं केली हत्या! आणि..

भाजपा नेता अरूण यादव (Arun Yadav) यांनी महापौर पदाची उमेदवार असलेल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. ही हत्या केल्यानंतरही ते थांबले नाहीत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून : भाजपा नेता अरूण यादव (Arun Yadav) यांनी महापौर पदाची उमेदवार असलेल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेचं कारण आता उघड झालं आहे. अरूण यादव यांच्या पत्नी प्रिती कुमारी यांनी थकव्याचं कारण पुढे देत एक दिवस प्रचार न करता आराम करू असं म्हंटलं होतं. त्यामुळे संतापलेल्या यादव यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अरूण यादव हे भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी मुंगेर महापालिका निवडणुकीतील महापौर पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. यादव गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसह महापौर निवडणुकीचा जोरदार प्रचार करत होते. यादव यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. या वादाचा शेवट या पद्धतीनं होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. ज्या बंद खोलीमध्ये दोघांचेही मृतदेह आढलले तिथं दोन पिस्तूल सापडली आहेत. त्यावरही नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांना सूचना मिळाल्यानंतर त्यांनी यादव यांच्या खोलीत प्रवेश केला. त्यावेळी पत्नीचा मृदेह फर्शीवर तर यादव यांचा मृतदेह पलंगावर पडला होता. पलंगावर दोन भरलेले पिस्तूल पोलिसांना सापडले. 5 वर्षांच्या मुलाचा दाबला गळा अन् आईनेही गळफास घेऊन संपवला जीव कोण होते यादव? अरूण यादव हे बिहारमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते होते. वेगवेगळ्या प्रकरणात त्यांनी जेलची हवा देखील खाल्ली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष झाले. त्यांनी पत्नीलाही राजकारणात सक्रीय केले होते. त्यांच्या पत्नी महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. यादव दाम्पत्याच्या मृत्यूनं बिहारमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या