बिहार, 31 मे: सायकल गर्ल (Bihar cycle girl) म्हणून प्रसिद्ध असलेली ज्योतीला पितृशोक झाला. तिच्या वडिलांचं हृदयविकाराच्या (heart attack) झटक्यानं निधन झालं आहे. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातल्या सिंहवाडा येथील सिरहुल्ली गावात ज्योती राहते. 13 वर्षीय ज्योती गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात वडील मोहन पासवान यांना सायकलवरुन गुरुग्राम ते दरभंगापर्यंत प्रवास केला होता. 8 दिवस वडिलांना सायकलवरुन प्रवास केलेली ज्योती त्यानंतर प्रसिद्ध झाली. संपूर्ण बिहारमध्ये तिची चर्चा होऊ लागली होती. 10 दिवसांपूर्वी मोहन पासवान (Mohan Paswan) यांच्या काकांचं निधन झालं. त्यांच्या दशक्रियेच्या विधीसाठी समाजातील काही लोकांसोबत ज्योतीचे वडील चर्चा करत होते. त्यांच्यासोबत चर्चा संपल्यानंतर मोहन उभे होताच त्याचजागी कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं ज्योतीच्या कुटुंबियासह गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. हेही वाचा- काय बोलणार; डिलीव्हरी बॉयच्या थोबाडीत मारून पोलिसांनीच पळवली दारूची पिशवी अशी आली चर्चेत 2020 ला कोरोना लॉकडाऊनच्या वेळी ज्योतीनं आपल्या आजारी वडिलांना गुरुग्राम ते दरभंगा असा सायकलवरुन प्रवास केला होता. जवळपास 1300 किलोमीटर असा तिनं सायकलचा प्रवास करत आपल्या वडिलांना घरी आणलं होतं.तिच्या या कार्याचं देश-विदेशात बरंच कौतुक झालं. ज्योतीच्या या धाडसीवृत्तीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पनं कौतुक केलं होतं. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. जानेवारी 2020 ला त्यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वडिलांच्या अपघाताची माहिती मिळताच ज्योती आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी गुरुग्रामला पोहोचली. त्याच दरम्यान देशात लॉकडाऊन जाहीर झालं. त्याकाळात त्यांच्या समोर अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यानंतर धाडसी ज्योतीनं 400 रुपयांमध्ये सायकल विकत घेतली आणि आपल्या वडिलांना गुरुग्रामवरून दरभंगाला पोहोचली.